रागिनी खुप एक्सायटेड होती…मनस्वी आणि रिशभ भेटल्यावर काय घडल असलं त्यांच्यात याबद्दल तिच्या मनात कुतूहल निर्माण झाल होत.
मनस्वी रूममध्ये आल्याआल्या रागिनी तिचा पिच्छा पुरवते….”काय मग मनू मॅडम……आज काय मज्जा होती एका मुलीची….कुठे गेला होतात फिरायला…”
मनस्वी कंटाळली होती….तिला खरतर याविषयावर काहीच बोलायच नव्हत….कारण जेवढं ती रिशभविषयी बोलणार होती; तेवढा रिशभ तिच्यापासून दूर जाईल याची तिला भिती वाटत होती.
पण रागिनी तिची खास मैञिण तिला आपल्याविषयी जाणून घेण्याची ऊत्सुकता असणारच म्हणून मनस्वी बेडवर गळ्यातील ओढणी टाकून स्वतही बेडवर आडवी होते…आणि कंटाळा आला असूनही रागिनीला जवळ बसायला सांगून सगळ सांगू लागते…
“हे बघ रागिनी तुला जस वाटत आहे…..तस आम्ही कुठेही कपल स्पाॅटला फिरायला वैगेरे गेलो नव्हतो. काॅफी शाॅपमध्ये काॅफी घेतली आणि जवळच्या एका गणपती मंदिरात गेलो. तुला माहित आहेच की ते मंदीर….”
“काय मंदिरात? सो बोरिंग…..”
“हा मला माहितच होत…तू अस बोलणार…. म्हणून तुला सांगणारच नव्हते पण माझ मन तरी कुठे राहतय….”
“साॅरी डिअर…माय स्वीट मनू….मनी…..हा बरं ठीक आहे मंदिर तर मंदीर. पण सांग ना काय काय बोललात…?”
“छान वाटल गं बोलून त्याच्याशी…..खरच माझी चाॅईस चूकीची नव्हती. तो खूप भारी आहे गं….म्हणजे पूर्ण माझ्या विरोधी आहे विनाकारण खूप इमोशनल होत नाही….स्मार्ट आहे…बोलायलाही हूशार आहे.”
“वो…..हो…..इतनी तारीफ तो कभी हमारी भी नही की गयी…मोहतरमा…!….नसीबवाले वो रिशभबाबू….!”
“झाली तूझी डायलाॅगबाजी सुरू? कधीतरी सिरीअस होत जा…..निदान माझ्याविषयी तरी. तुला माहीत आहे ना माझ्या लाईफमध्ये काय-काय चालू आहे.”
“हो मनू….जस्ट चील….तुलाच नाॅर्मल मुडमध्ये आणण्यासाठी करते ना मी….तुला माझा भुलक्कडपणा दिसतो आणि तुझी काळजी दिसत नाही का? राहूदे मला काहीच सांगत जावू नकोस. मी जाते झोपायला.” अस म्हणून रागिनी झोपायला जायला निघते.
तशी मनस्वी ऊठून बसते आणि रागिनीला साॅरी म्हणत तिचा हात ओढून तिला जवळची खूर्ची देऊन बसवते.
“रागिनी बस बस गं…..तुझ्या भाषेत सांगायच म्हणजे माफ कर दो हमें…..”
रागिनी डोळ्यांच्या भुवया उडवत “हा….हा…चलो माफ कर दिया….चल सांग…तुला बर वाटल ना त्याच्याशी बोलून मग झाल तर….”
मनस्वी थोडी लाजत “हो….खूप छान वाटल. मनमोकळ झाल माझ….मला ना आणखी भेटावस वाटतय…..” मनस्वी स्वतला सावरत बोलते.
“हम्म…..म्हणजे निदान इथपर्यंत तरी पोहचलात तुम्ही की पुन्हा भेटावस वाटत आहे….रिशभ, त्याला काय वाटतय?”
“तो….तर तयारच होऊन बसला आहे….म्हणत होता नंतर कधी भेटूयात पण मीच बघूयात भेटूयात देवाच्या मनात असेल तर अस म्हटल.”
“काय तूपण…..सांगायच ना सरळ भेटूया फोन करते तुला” रागिनी डोक्यावर हात मारत.
मनस्वी हताश होऊन “ईच्छा तर खूप होती पण नाही म्हणू शकले मी….! पण मला मनातून वाटत आहे की आमची भेट होईलच परत एकदा तिही न ठरवता….!”
“होप सो….आणि नाही झालीच तर मी घडवून आणेन. मनू तुझ प्रेम तूला मिळायलाच हव.”
“काही….नाही….हा….तु मधे पडायच नाहीस अजिबात. ऊगीच खोट्या अपेक्षा नको आहेत मला आणि जे होणारच नाही त्यामागेही लागायच नाही मला….!”
“ओके……होईल सगळ ठीक. आता ऊगीच भावनिक होऊ नकोस….मस्त निवांत रहा, छान अभ्यास कर…..आणि हो आजची भेट आठवत झोप म्हणजे छान झोप लागेल…” त्त्यातूनही रागिनी मनस्वीला चिडवतेच आणि झोपायला जाते.
मनस्वी रागिनीला गुड नाईट करून स्वतही बेडवर पडते आणि डोळे झाकते पण डोळ्यासमोर रिशभच दिसत असतो. तो, त्याच लोभस हसणं….तीने स्वत जे म्हणेल ते रिशभने ऐकलेल, चक्क तिच्यासाठी गाडी बाजूला लावून आॅटोने प्रवास केलेला….!
तिच्यासाठी घेतलेली कॅडबरी, गणपती मंदीरात बसल्यावर मनोभावे तो करत असलेला प्रणाम, गर्दीतुन वाट काढत तिला करून दिलेली जागा, लाॅनमध्ये बसल्यावर तुझ्यासाठी गजरा घेऊ का म्हणून मागे लागलेला तो…..पण आपण किती निष्ठूर होऊन त्याला मला नाही आवडत गजरा अस म्हटलो होतो….एक-एक क्षण मनस्वी पुढून जात होता…..त्याबद्दल मनापासून साॅरी रिशी…..घेतला असता गजरा तर काय बिघडल असत माझं? आता तो गजरा जवळ असता तर मला रिशभ जवळ नसल्याची जाणीव झाली नसती…..अस म्हणून मनस्वी स्वतला कोसत होती….!
अचानक तिच्या लक्षात येत की तिने आल्यापासून रिशभला काॅलच केला नाही; तो केव्हा पोहचला असेल, त्याने काॅल केला असेल, मेसेज कर म्हटला होता मला झोपण्याअगोदर वाट पाहत बसला असेल तो माझी…!
अस वाटून मनस्वी मोबाईल शोधते….मोबाईल तिच्या पर्समध्ये तसाच होता…बाहेरही काढला नव्हता तिने ….ना सायलेंन्ट मोड काढला होता…..मीपण ना? अस म्हणुन मनस्वी स्वतच्याच डोक्यावर हात मारून घेते आणि पटकन मोबाईल अनलाॅक करून पाहते तर…..पप्पांचे चार-पाच मिसकाॅल, रिशभचे चार-पाच मिसकाॅल, त्याचे मेसेजस येऊन गेले होते.
मनस्वीला टेंन्शनच येत….पप्पांचे एवढे मिसकाॅल कसे? आपल लक्षच नाही गेलं मोबाईलकडे……ती पटकन फोन लावते….तिकडून मम्मी ओरडत होती…फोन का उचलला नाहीस म्हणून.
मनस्वी सगळ्या स्वप्नांतून खडकन जागी होत बाहेर येते…..तिला समजत नाही काय ऊत्तर द्यायच.
“अग काही नाही…..मी अभ्यास करत होते. मोबाईल सायलेंन्टवरती होता. बोल की जेवलीस का?”
“कसली जेवतेय? बापाने वैताग दिला आहे तूझ्या. तू फोनच का ऊचलला नाहीस म्हणून नाही नाही ते बोलत बसल्यात.”
“अग पण…..नाही पाहिला फोन काय करू….आता दे बर त्यांच्याकडे…” मनस्वी मनातून खूप घाबरली होती पण वरून न दाखवता बोलत होती. का कोणास ठाऊक तिला भिती वाटत होती की मी रिशभ बरोबर बाहेर गेले होते; हे घरी समजल तर नाही ना? देवा माझी मदत कर.
मम्मी रागावतच “हे बघ….मनू ते तुझ्याशी आता बोलत नाही आहेत पण खूप चिडल्यात…ऊगीच काही ऊद्योग करत बसू नकोस. राघव बरोबर लग्न मोडल्यामुळे ते खूप टेंन्शनमध्ये आहेत आधीच…!”
“अग पण मम्मी….तुला माहीत आहे ना राघव कसा मुलगा होता…..आणि पप्पांनाही समजल होत ना?”
“मनू तू पहिल्यांदा सांग….तु कुठे गेली होतीस? फोन का नाही ऊचललास?”
मनस्वीला समजत नव्हत…पप्पा एवढे का चिडल्यात आणि मम्मी सारखे असे प्रश्न का विचारत आहे. अस बर्याचवेळा व्हायच की मनू स्टडीरूम मध्ये फोन सायलेंन्ट ठेवायची आणि फोन ऊचलायची नाही; पण नंतर रिटर्न काॅल केला की काही बोलायच नाही कोण समजुन घ्यायच. पण आज काय झाल होत….त्यांना खरच तर नाही समजल ना? मी आणि रिशभ काॅफीशाॅप आणि नंतर गणपती मंदिरात…..पण हे कस शक्य आहे मी इथे पुण्यात आणि ते तिकडे गावी….?
मनस्वी पूर्णपणे रडवेली झाली होती….तिला रडूच येत. कारण तिला माहित होत; पप्पा तिकडे मम्मीजवळ खुप काही बोलत असणार, ओरडत असणार.
“अग मम्मी खरचं सांगत आहे….मी अभ्यास करत होते. तु माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीस? ठीक आहे तुम्हाला विश्वास नसेल तर मी ऊद्याच गावी येते…आपण बोलूया”
यावर मीराताई “त्याची गरज नाही….पण इथूनपुढे फोनवर लक्ष राहू देत जा….आम्ही कधीही फोन करू” अस म्हणून मीराताई फोन ठेवतात.
मनस्वीला जाणवत होत आपण कोणत्या विश्वासाची भाषा करतोय? मी खरच तोडला आहे का मम्मी-पप्पांचा विश्वास? काहीस कळायला मार्ग नव्हता की मला स्वतला कळवून घ्यायच नाही….डोळ्यावर पट्टी बांधली आहे का मी स्वतच्या?
मनस्वीच एक मन म्हणत होत माझच चुकल मी का गेले रिशभबरोबर…..मला इथे अभ्यासासाठी ठेवल आहे…..फिरण्यासाठी नाही, प्रेम करण्यासाठी नाही…पण कस समजवू या मनाला….नव्हत भेटायच मला रिशभला, पण त्यादिवशी तो योगायोगानेच भेटला….तर दुसर मन म्हणत होत काय बिघडल भेटले तर माझ प्रेम होत आणि आहे त्याच्यावर? कुठे फिरायला गेले नव्हते मी फक्त एक काॅफी प्यायलेय आणि देवाच्या पाया पडलेय…..पण माझ मन मोकळ झाल त्याच्याशी बोलून. आजवर खरचं कधीही स्वतचा विचार नाही केला….तो राघव इतका मानसिक ञास देत होता…तरीही त्याच्याशी लग्न करायला तयार झाले….का देवा माझ्याबरोबरच अस का? राजरोसपणे चूकीच्या पद्धतीने फिरणारी मुल-मूली त्यांना काहीच होत नाही…कोणीही ञास देत नाही ऊदाहरणार्थ राघव पण मी प्रामाणिक पणे माझ्या मर्यादा न ओलांडता फक्त एका मुलाला भेटले तर मला लगेच गुन्हेगाराच्या जागी ऊभा करण्यात आल? का? माझ्याचबाबतीत अस का?” मनस्वीच्या डोळ्यातुन अश्रू थांबत नव्हते. होस्टेलमध्ये सर्वजण झोपले होते….मनस्वीला खूप मोठ्याने रडावस वाटत होत पण आपल्या रडण्याचा आवाज कोणालाही ऐकू जायला नको म्हणून ती तोंडाला हात लावून रडत, बाथरूम मध्ये जाते आणि पाण्याचा नळ चालू ठेवते. जेणेकरून ती रडलेला आवाज बाहेर कोणालाही ऐकू जावू नये.
पाहूया पुढच्या भागात मनस्वीच्या पप्पांना नक्की समजल होत का रीशभ आणि मनस्वीबद्दल? आणि समजल असेलच तर ते कोणाकडून? मनस्वी कायमचच पुणणे सोडेल की मम्मी-पप्पांना समजून सांगेल? रिशभला पुन्हा भेटेल की तिला कायमचचं विसरून जाव लागेल त्याला?
©मधुदिप ब्लाॅग्ज
फोटो_साभार_pixabay
प्रिय वाचकहो….तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा….मनस्वी खरचं चूकत होती का? तिच प्रेम चुकीच होत का? कारण काय चूक-काय बरोबर मनस्वीला समजत नाही आहे; कमेंन्ट करून तुम्हीही थोडी मदत करा….धन्यवाद!!
टीप:- प्रिय वाचकहो,“सुटलेली_ती” या कथामालिकेचे सगळे भाग तुम्हाला माझ्या वैयक्तीक ‘रंग आयुष्याचे’ या फेसबुक पेजवर वाचायला मिळतील. या पेजवर कोणताही खंड न पडता प्रत्येक दिवशी पुढचा भाग पोस्ट केला जाईल….तरी प्लीज या पेजवर जावून तुम्ही वाचू शकता:
पेजलींक:http://www.facebook.com/hernewinning/
पेजला नक्की लाईक करा…खुप धन्यवाद..!!
Comments 2