भाग १ इथे वाचा:-https://madhudeep.com/?p=803
भाग २ :-
नंदिनी मनात ठरवल्याप्रमाणे निशाला संसाराच्या रहाटगाड्यातून स्वतलाही थोडा वेळ द्यायला हवा हे समजावण्यासाठी चहा घेण्याच्या बहाण्याने घरी बोलवते.
निशाच सुरु होत अग मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, आई-बाबा ट्रीपला जाणार आहेत, राम बाहेरगावी जाणार आहे आॅफीसच्या कामासाठी एक ना अनेक कारणे….पण माघार घेईल ती नंदिनी कसली…ती निशाला ठणकावून सांगते; तू आज नाही आलीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही…अग एवढ्या वर्षांनी भेटत आहोत आपण आणि तरीही तू अर्धा तास माझ्यासाठी काढू शकत नाहीस. झाल निशाला थोड इमोशनल ब्लॅकमेल करायची गरज की निशा तयार सर्वांच मन राखायला….शेवटी काय समोरच्याच मन मोडेल ती निशा कसली.
निशा संध्याकाळी चार वाजता नंदिनीच्या घरी जाते. नंदिनीने खुप छान तयारी केली होती….निशाच्या स्वागताची.
निशा भारावून जाते…नंदिनीचे मनापासून आभार मानते. निशा आणि नंदिनी मस्त चहा घेत बसतात. निशाला नंदिनीच्या घरी खूपच रिलॅक्स वाटत होत… नंदिनीने तिला तस फील करवून दिल होत. आयुष्यात अशी एक तरी जीवा-भावाची मैञीण हवीच. जिथे आपण आपली सुख-दुख बोलून मोकळ होऊ शकू.
निशा नंदिनीला विचारते “तु अशीच राहते का ग बिनधास्त….तुझे मिस्टर, मुलगा येतील सहा वाजता मग त्यांच्या नाश्त्याची तयारी नाही का करायची तुला?”
त्यावर नंदिनी थोड हसत “अग येतील तेव्हा पाहूयात ना आत्ताच त्याच टेन्शन कशाला घेऊन बसू…?”
“मला तर जमतच नाही ग अस बिनधास्त रहायला….सारख कोणी ना कोणी येत जात असत घरात….मग त्यांच्या सर्वांच्या वेळा, खाण-पिण, नाश्ता-पाणी कराव लागत वरचेवर.” निशा
नंदिनी “हा मग ती तुझी चूक आहे….तु जर अशीच एखाद्या गार्डप्रमाणे येणार्या-जाणार्याला सलाम ठोकत बसलीस तर लोक तुझ्याकडून हीच अपेक्षा करणार…माफ कर…मी जरा रफ भाषेत बोलतेय पण मला तूझा राग येत आहे…कशी होतीस तु काॅलेजमध्ये असताना…अभ्यास करत-करत स्वतच्या आवडी-निवडी जपायचीस आणि आता? कितीदिवस तु स्वतला आरशात तरी नीट पाहीलयस की नाही अशी शंका येतेय…”
निशा “अग पण संसार म्हटलं की अस होतच ना…स्वतकडे दुर्लक्ष…मुलांच शिक्षण, नवर्याचा जाॅब, सासु-सासर्यांच आजारपण….मी या गोष्टी टाळू तर नाही शकत ना?”
“मी कुठे म्हणतेय तू तुझ्या जबाबदार्या झटक. तू तुझी सर्व कर्तव्ये पार पाड पण हे सगळ पार पाडत असताना तु स्वतकडे लक्ष दे….स्वतकडे लक्ष देणं हे तूझं आद्य कर्तव्य आहे…तूला एक सांगते..इथे फक्त तुच तुझी आहेस.”
“म्हणजे मला नाही समजल?” निशा
“अग आता तुझ्या घरात लहान तर कोणी नाही….सगळेजण मोठे आहेत….त्यामूळे सर्वजण स्वतची कामे स्वत करू शकतात. प्रत्येकवेळी तू त्यांच्यापुढे धावायची गरज नाही…अशाने त्यांच काही नुकसान नाही होणार ऊलट स्वतची कामे स्वत करण्याची चांगली सवय लागेल त्यांना….आणि त्यामुळे तुझा वेळ वाचून तो थोडाफार शिल्लक राहिल…जो की तो तू तुझ्यासाठी वापरू शकशील….”
“पण मी कशासाठी वापरू हा शिल्लक वेळ…त्याने काय होणार आहे…मी थोडी ना आता जाॅब करणार आहे…” निशा
“अग जाॅबसाठी नाहीच म्हणत मी….पण विश्रांती घेत जा जरा….तुझा चेहरा बघ कसा रडवेला होऊन गेलाय…स्वतचे छंद जोपास. व्यायाम-योगा करत जा….आता कर-कर करशील ऊपाशी राहून कामे आणि म्हतारपणी बसशील अंथरूणाला खिळून…तेव्हा कोण करेल तुझ? म्हतारपणी आपली सेवा कोणाला करायलाच लागू नये अशी तब्येत मेंन्टेन करावी आपण…कारण आत्तासध्या तुला जी सेवा करावी लागतेय तुझ्या सासु-सासर्यांची ती तुझ्या सुनेला तुझ्यासाठी करायला नको …आणि हे बररं आहे का अॅनिमीक होण?…..तू झोपही पुरती घेत नाहीस ना? ते समजत आहे तुझ्या डोळ्याखाली झालेल्या काळ्या वर्तुळांवरून. ”
“हो नंदिनी तु बरोबर ओळखलस माझे हिमोग्लोबीन खुप कमी झाल आहे….टॅबलेट चालू आहेत….वाढतच नाहीये..सकाळी लवकर ऊठाव लागत…राम म्हणतो दुपारी जरा विश्रांती घेत जा पण आई-बाबांची जेवण्याची वेळ दुपारी….आणि बाकी वरची कामे असतातच जोडीला..त्यामुळे दुपारीही झोप नाही मिळत. दिवसाचे चोवीसतास कमी पडतात बघ….काही समजत नाही गं…माझ आयुष्यात काय चाललयं. रोजचा दिवस सारखाच असतो.”
“तेच सांगतेय निशू…आपल्या आयुष्यात आपल काहीतरी पॅशन हव…जे आपल्याला फ्रेश करेल, आनंद देईल…अस पॅशन, छंद आपण जोपासल तर रोजचा दिवस सारखा नाही होणार…आणि तुला ऊदास नाही वाटणार…तुझे सासु-सासरेच पहा; किती छान जगतायेत स्वतच ऊरल-सुरल आयूष्य…आणि तु-??
तू ऊगीच स्वतच-स्वतच्या आयुष्यातील अडसर होऊन बसलेयस….चूक फक्त घरातल्या लोकांची नव्हे तर तूझीच आहे…तु स्वतला वेळ दिलास, स्वतचा रिस्पेक्ट केलास तरच तुला बाकीचे रिस्पेक्ट देतील ना…इथे फक्त तुच तूझी हे कायम लक्षात ठेव.”
“पण अग मूलं, राम….मी त्यांच्याकडे दूर्लक्ष नाही करू शकत. ते मला मम्मी स्वार्थी आहे, स्वतचाच विचार करतेय अस नाहीत ना गं म्हणणार?”
“मुळीच नाहीत म्हणणार…आणि म्हटलंच तर म्हणूदे..कारण कस आहे आपल्याच लोकांच्या मनात आपण तेव्हा खटकतो जेव्हा आपण आपल्या मनासारख वागतो….सुरूवातीला खटकेल त्यांना पण नंतर सवय होईल त्यांना आणि हळूहळू आवडू लागेल त्यांना तुझ्यातील हा बदल.”
“खरचं नंदिनी? अस होईल…मी स्वतला वेळ दिला तर किती गोष्टी सकारात्मक घडतील…मी खुष असेन. मी खुष म्हणजे आपसूकच घर खुष राहीलं…थोडस कठीण जाईल मला सगळ पण अशक्य नक्कीच नाही…थॅंन्क्यू नंदिनी थॅंन्क्यू…अगदी मनापासून…माझ्यातल्या मला जाग केल्याबद्दल. माझ्या स्वचा आदर करायला शिकवलसं त्याबद्दल….”
“अग थॅंन्क्यू नको….तुझ्यातील बदल हवाय…तुझा हसलेला-फुललेला चेहरा पाहयचा आहे. तुझीच-तु झालेली पाहयच आहे बस्स! ”
“लवकरच पाहशील…आणि याची सुरूवात आज-आत्ता पासूनच झाली आहे….कारण मी तुझ्याकडे येऊन जवळजवळ दोन तास झालेत…शाळेतून मुल येऊन बसली असतील….आई-बाबा आले असतील…राम ही आला असेल कदाचित पण आज मला पहिल्यासारखी धाकधूक नाही सर्वांच्यावेळा सांभाळायची…मला शोधत असतील, माझी वाट पाहत असतील…चहा-नाश्त्यासाठी…फोनवर किती मिसकाॅल आल्यात बघ…जे की मीही त्यांना कितीवेळा करते पण आम्हाला वेळ मिळाला नाही अस सांगून ते ऊचलण्याच टाळायचे…आज त्यांच्यावर ती वेळ आली आहे….समजली असेल त्यांना माझी किंमत…जी की मी स्वतच कमी करून घेतली होती…जबाबदार्या नी कर्तव्याच्या नावाखाली…पण आज समजतय…हे संसाराच रहाटगाडग असच चालू राहणार आहे…आपल्यालाच स्वतसाठी जगायला….स्वतला खूष ठेवायला शिकायला हवं…इथे फक्त मीच माझी म्हणायच आणि दुसरे येऊन मला खूश ठेवतील ही अपेक्षा न करता मी स्वतच मला खूश ठेऊ शकते हे ऊमगल की सगळ्याच गोष्टी खुप सोप्या होऊन जातात. हो ना ?”
“येस….दॅट्स लाईक माय बेस्ट फ्रेंड.” म्हणून नंदिनी आनंदाने निशाला मिठी मारते….आणि निशा मनाशी खूप काही ठरवून तिला बाय करून घरी जायला निघते….माञ येताना मनात धाकधूक असणारी निशा प्रसन्न मनाने आणि आत्मविश्वासाने घरी जाताना पाहून नंदिनी मनोमन सुखावते.
कथेतून सांगायच म्हणजे; बर्याच गृहिणी दिवसराञ घरकामात अडकून पडतात…त्यांना कामामुळे दिवसाचे चोवीसतासही कमी पडत असतात बरं…आणि त्यात आणखी एक भर म्हणजे कायम मनात भिती माझी काम होतील का? कधी आवरणार माझ वैगेरे. बर घरातल्या कोणाला सांगितल तर घरातली लोकही लक्ष देत नाहीत…रोज मरे त्याला कोण रडे असच काहीस होऊन जात या गृहिणींच…मग परत मी एवढ करते यांच्यासाठी तरी माझ्याकडे कोण लक्ष देत नाही, माझी काळजी करत नाहीत अस वाटून स्वतच दु:खी होणं….त्यातून नैराश्य, आजारपण येण…हे सर्रास दिसून येत. त्यापेक्षाआपण स्वतच स्वतचे कैवारी होऊयात
ना…स्वतला थोडावेळ देवूयात…!
बरं हे फक्त गृहिणींच्या बाबतीतच होतं का? तर नाही जाॅब करणार्या स्ञीयांना तर प्रचंड तारेवरची कसरत करावी लागते. लोकांना फक्त कमवलेले चार पैसे दिसतात. पण त्या वर्किंग वूमनला बाहेरील खूप गोष्टींचा सामना करावा लागतो. घरातील लोक फारतर समजून घेत असतील परंतु आॅफीसमधील लोक, बाॅस, प्रवास करताना होत असलेली धावपळ वैगेरे.या सर्व गोष्टी तिला नकोशा असतील तरी पर्याय नसतो. शेवटी काय गं स्ञी कोणतीही असो हाऊसवाईफ वा वर्कींग तिला संघर्ष काही चूकत नाही. तिच स्ञीपण तिला गप्प बसू देत नाही. असो.
आपण अस करु शकतो; एकदिवस नाश्ता करूच नका, त्याऐवजी मूलांना सुकामेवा खायला द्या. घरातली जी कामे रोजची आहेत त्याकडे थोडस दुर्लक्ष करून सुट्टीच्या दिवशी ती कामे काढा आणि घ्या घरातल्या सर्व सदस्यांना कामाला…बघा मग कसा तुमचा कामाचा लोड कमी होईल आणि बरोबर घरातल्या सदस्यांना तुमच्या कामाची किंमतही कळेल…
एकापाठोपाठ एक कामे करण्यापेक्षा मधेमधे थोडा ब्रेक घेऊन करायची म्हणजे थकायला होत नाही…तसेच त्यावेळात आपण नाश्ता-चहा करू शकता. सगळी कामे झाल्यावर नाश्ता करणे म्हणजे फुकटच्या डोकेदुखी आणि पित्ताला आमंञण देणे…मस्तपैकी संध्याकाळी शतपावली करा…तेवढच रिलॅक्स वाटेल आणि छोटासा व्यायामही होईल….महत्त्वाच म्हणजे स्वतचे छंद जोपासा मग ते कोणतेही असो हरकत नाही म्हणजे मन फ्रेश आणि आनंदी राहिल…थोडक्यात सांगायच म्हणजे तुम्ही तुमचं व्हा….म्हणजे इतरही लोक तुमचे होतील…..धन्यवाद!
©माधुरी दिपक पाटील
फोटो_साभार_गुगल
अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या
रंग आयुष्याचे:-http://www.facebook.com/hernewinning/
या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फाॅलो करा….धन्यवाद!
Comments 1