आज एका ओळीने मन पुन्हा एकदा आनंदी, प्रसन्न झाल. जे की नेहमीच असायलाच हवं. पण होत अस कधीतरी आपणच आपल मन दुखी करण्यासाठी काहीतरी कारणे शोधतो. मन खट्टू करून घेतो….होतं कधीतरी अस….माणूस म्हटलं की अथांग विचार आणि त्याच्यावर पुन्हा अतीविचार….हुश्श…!!
तेव्हा अचानक काहीतरी वाचण्यात, ऐकण्यात वा पाहण्यात येतं….आणि मनातील सर्व प्रश्नांची ऊत्तरे एका झटक्यात मिळून जातात. मनाला एकदम भिडून जातात….अहाहा….काय तो सुंदर, संपूर्ण असा विचार…!!
आदरणीय हरीवंशराय बच्चन यांच्या या ओळीने माझ्याबाबतीत असच काहीस झाल…की तो मौलिक विचार पटकन इथे मांडावा अस झालं.
आयुष्यात खूप वेळा, खुप सार्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. मन ऊदास होऊ पाहत…तेव्हा आदरणीय हरीवंशराय बच्चन म्हणतात,
“तुम्हारे मन का हुआ तो अच्छा है
और तुम्हारे मन का नही हुआ तो और भी अच्छा है……।।”
अरेच्छा मनासारख नाही झाल्यास ते चांगल कसं???
तर “जेव्हा आपल्या मनासारखं होत नाही, तेव्हा वर असणार्याच्या मनासारख होत असतं आणि जे आपल्यासाठी खूप चांगलं होणार असतं…!!”
©मधुदिप ब्लाॅग्ज
(वर माझा अनुभव काय होता, कसा होता हे दुर्लक्षित करा….फक्त आदरणीय हरीवंशराय बच्चन यांच्या ओळी पुन्हा एकदा वाचा…मस्त, छान वाटेल….stay happy_stay thoughtful)
फोटो_साभार गुगल.