कुंकू लावा अथवा लावू नका…. परंतु कुंकू लावण्याचे फायदेच आहेत; तोटे तर नक्कीच नाहीत….!!
कुंकू लावण्यावरून वाद घालण्यापेक्षा ते का लावावे हे कारण समजून घेणे मला जास्त महत्वाचे वाटते…
आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सात चक्रामधील सहावे चक्र ज्याला आपण आज्ञा चक्र, ज्ञान चक्र किंवा तिसरा डोळा असे संबोधतो, ते चक्र आपल्या कपाळावर असते. त्याला जागृत करण्यासाठी पूर्वी बायका कुंकू लावायच्या. याचे अनेक फायदे आहेत जसे की…..मनःशांती, सकारात्मकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे चेहऱ्यावरील स्किन वरती येणारे तेज…. हे सर्व बदल फक्त एका वर्तुळाकार लावलेल्या कुंकवामुळे होतात आणि आजही हे तितकेच सत्य आहे….!
बररं हे फक्त स्ञीयांसाठीच नाही आहे तर पूर्वीच्याकाळी स्ञी-पुरूष दोघेही कुंकू लावायचे. फरक फक्त शब्दाचा आहे. स्ञिया लावायच्या त्याला “कुंकू” म्हटलं जात होत आणि पुरूष लावायचे त्यासाठी “टिक्का” हा शब्द होता.
एक काळ असा होता सुशिक्षीत, इंजिनिअरींग विथ डिस्टिंग्शन असणार्या मलाही हे सत्य जेव्हा समजल तेव्हा डोक्यात लख्खं प्रकाश पडला आणि माझ्या कपाळावरच्या आठ्या कुठच्या कूठे पळून गेल्या (कारण कपाळावर आठ्या तेव्हाच येतात जेव्हा आपले आज्ञा चक्र खराब होते म्हणजेच आपणाला राग येतो…आणि कपाळावरचे कुंकूच ते आज्ञा चक्र शांत करते). याबद्दल आणखी माहीती हवी असेल, तेही पुराव्यासह तर तुम्ही सहजयोग अभ्यासावा….!!
पोस्टसह खाली काही फोटो दिले आहेत; त्यामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी आम्हा तिघांच्या कपाळाला तुम्हाला ‘कुंकू(टिक्का)’ दिसेल(माझे मिस्टर रोज आॅफिसला जाताना माझ्याकडून कपाळावर कुंकवाचा टिक्का लावून घेतात व मगच घराबाहेर पडतात)….मग इथे बाकी सोशलमिडियावर कुंकूवाबरोबर स्ञी स्वातंञ्य वैगेरे जे फवारे सोडले जात आहेत याला काहीच अर्थ नाही….तुम्ही तुमच्या कोणत्याही पेहरावावर ‘कुंकू’ लावू शकताय….आपणाला “आज्ञा चक्र” शांत ठेवायच आहे ना की राजकारण तापवायच आहे….!!!!
©माधुरी_दिपक_पाटील
( आणखी एक जो स्वत कुंकू लावेल त्यानेच कुंकवाच्या पाविञ्याविषयी बोललेलं बरररं….मग तो कोणीही असो स्ञी असो वा पुरूष….हिंदू असो वा अन्य…!!
हे झाल माझ वैयक्तिक मत….बाकी शेअर करावयाच झाल्यास नावासह शेअर कराल..धन्यवाद…!!)
पूर्ण पोस्ट इथे वाचा:रंग आयुष्याचे
chhan…