Friday, February 3, 2023
मधुदीप
  • होम
  • आठवणी
  • सामाजिक
  • अभ्यास
  • स्ञीवादी
  • प्रेम
  • आत्मविश्वास
  • आरोग्य
  • नवरा-बायको
  • पालकत्व
  • प्रेग्नंसी
No Result
View All Result
मधुदीप
No Result
View All Result

सुटलेली_ती…भाग ४१

madhuri deepak patil by madhuri deepak patil
August 16, 2022
in सामाजिक
0
सुटलेली_ती….!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाग ४०:https://madhudeep.com/?p=72

सौरभ आणि मनस्वी सकाळी ऊशीरापर्यंत झोपले होते. घरातले बाकी सगळे केव्हाच ऊठून नाश्त्याच्या टेबलवरती पोहचले होते. सौरभ आणि मनस्वी अजून खाली कसे आले नाहीत? अस कोणीच कोणाला विचारत नव्हतं…..फक्त सगळे मनस्वी आणि सौरभच्या रिकाम्या खूर्चीकडे पाहून गालात हसत होते.

सूर्याची तिरपी कोवळी किरणे पडद्यांच्या फटीतून आत आली होती….अचानक मनस्वीला जाग येते. सूर्याची किरणे पाहून ती दचकून घड्याळ पाहते. आडे आठ वाजून गेले होते…..ती पटकन पाठीवर रूळणारे केस हातात पकडून क्लचमध्ये अडकवते…..आणि उठू लागते. मनस्वी कूशीतून बाजूला झाल्याने सौरभला जाग येऊन तो मनस्वीच्या हाताला पकडतो आणि तिला जवळ ओढतो.

मनस्वी “सौरभ…..प्लीज मला ऊठू दे. तू झोप. अरे घरातले सर्वजण काय म्हणतील. नऊ वाजायला आलेत.”

सौरभ आळस देत मनस्वीच्या केसांचा क्लच काढून तिला आणखीच जवळ ओढतो आणि मनस्वीचे ओठ स्वतच्या ओठांनी लाॅक करून टाकतो.

मनस्वी त्याच्या केसांत हात फिरवून त्याचे डोके बाजूला करते….व पटकन बेडवरून खाली ऊतरते.

सौरभ तिला “मनस्वी थांब ना……”

मनस्वी सौरभकडे बघून हसते आणि गडबडीत टाॅवेल घेऊन बाथरूममध्ये पळून जाते.

सौरभ आळस देत तसाच बेडवरती पडून राहतो……मनस्वी सुंदरशी साडी घालून आवरत होती. आज काही केल्या तिला साडीची पिनअप जमत नव्हती. तिच्या मनात खाली जावून आता सगळ्यांना फेस कस करायच?अनन्या चिडवेल आता? इतका ऊशीर झाला आहे ऊठायला मग आई काय म्हणतील? असे विचार चालू होते. त्यामूळेच की काय तिला साडीची पिन जमतच नव्हती. सौरभ मनस्वीला अस ञासलेलं पाहून बेडवरून खाली ऊतरतो.

तो मनस्वीच्या साडीचा पदर हातात घेऊन त्याच्या घड्या बनवतो आणि साडीची व्यवस्थित पीन करून देतो. मनस्वीला आश्चर्यच वाटतं सौरभने इतक्या छानपैकी साडीची पिन करून दिली होती…..!

मनस्वी एकदा आरशात पाहून साडीच्या निर्‍या व्यवस्थित आहेत का ते पाहते आणि सौरभच्या हातात त्याचा टाॅवेल देऊन तूही लगेच आवरून ये अस सांगून खाली जाते.

सदाशिवराव आणि मंदार नाश्ता करून तिथून गेले होते. अनन्या आणि मालतीताईंचा नाश्ता सुरू होता. मनस्वी चाचरतच अनन्याला “गुड माॅर्निंग” म्हणते.

अनन्या तिला “very very sweet morning….अगदी तूझ्या आणि दादासारखी…!” अस म्हणून मनस्वीला डोळा मारते.

मालतीताई अनन्याला हाताने गप्प बसायला सांगतात….आणि मनूला खूर्चीवर बस म्हणून तीच्यासाठी नाश्त्याची प्लेट आणून देतात. मनस्वी नाश्ता करून घेते. तोपर्यंत सौरभ तिथे पोहचतो. तो अनन्या आणि मालतीताईंच्या समोरच मनस्वीला घास भरवतो. मनस्वी लाजून चुर होते….पण तिला भरवण्याचा सौरभचा हट्ट काही संपत नव्हता.

मालतीताई मुलगा आणि सूनेला एकमेकांत गुंतलेलं पाहून खूष होतात आणि तूम्ही बसा मी आवरते म्हणून किचनमध्ये निघून जातात. साकेतचा फोन आल्याने अनन्या फोनवर बोलत तशीच तिच्या रूमकडे निघून जाते.

मनस्वी आणि सौरभ नाश्ता करून अगोदर अनन्याच्या आणि नंतर मंदारच्या बेडरूमध्ये जातात. कारण अनन्या पूण्याला आणि मंदार बंगलोरला जाणार होता.

सदाशीवराव गाडीचा हाॅर्न वाजवतात. अनन्या आणि मंदार दोघे स्वतच्या बॅगांसह आवरून घराबाहेर पोर्चमध्ये येतात . मागोमाग मनस्वी-सौरभ, मालतीताई बाहेर येऊन थांबतात. अनन्या आणि मंदार दोघेजण वाकून मालतीताईंच्या पाया पडतात. अनन्या मनस्वीला हग करून “वहिनी काळजी घे…..मी पुन्हा लवकरच येईन….कामानिमित्त दादा येतोच पूण्याला….तूही येत जा त्याच्याबरोबर.”

मनस्वीच्या पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. मंदार सौरभला हग करून “bro…take care.”

सदाशिवराव पुन्हा गाडीचा हाॅर्न वाजवतात. मालतीताई अनन्या आणि मंदारला “काळजी घ्या….फोन करत जा.” अस बजावतात.

अनन्या आणि मंदार दोघे गाडीत बसतात….गाडी सुरू होते…..गाडी पूढे जाईपर्यंत खिडकीतून हात बाहेर काढून अनन्या मनस्वीला बाय करत होती……!

मालतीताई, मनस्वी आणि सौरभ घरात येतात. सौरभ मालतीताईंना “आई तू आराम कर…..लग्नाच्या काळात आणि लग्नानंतरही पुजा होईपर्यंत तुझी खूप धावपळ झाली आहे……कामाचा लोड पडला आहे तुझ्यावरती….तू निवांत  रहा आता……!”

“हो….रे. लोड पडला आहे पण मी खूप खूष आहे. मला मनस्वीसारखी गुणी सून भेटली आहे….” अस म्हणून मालतीताई मनस्वीच्या डोक्यावरून हात फिरवतात….”मी आहे माझ्या रूममध्ये…..तूम्ही दोघंही आराम करा. कुठे फिरायला जाणार असाल तर जावून या. काही लागलचं तर मला आवाज द्या.”

 

सौरभ “हो….आई. आत्तातरी नाही जात बाहेर…पण संध्याकाळी बघू….तुझ्या सुनेचा मूड असेल तर नक्की जावू बाहेर….!” अस म्हणून सौरभ हळूच मनस्वीकडे पाहून हसतो.

मनस्वी लाजून हसते आणि “आई…..तूम्हाला चहा वैगेरे काही बनवून देवू का? ” अस विचारते.

मालतीताई “काही नको….मी पडणार आहे थोडावेळ. कमलाताईंना सांगितल आहे दूपारच्या जेवणात काय बनवायच आहे ते….”

मनस्वी “ठीक आहे…..!”

मालतीताई आणि मनस्वी बोलत असतानाच सौरभ या दोघींच चालूदे…..म्हणून वरती स्वतच्या बेडरूममध्ये जावून मनस्वीची वाट पाहत बसतो.

मनस्वी रूममध्ये येताच….सौरभ तिला कवेत घेऊन दरवाजा लावून घेतो. मनस्वी काहीच न बोलता त्याच्या मिठीत स्वतला झोकून देते….आणि सुरू होतं….त्याच तिच्यात आणि तिचं त्याच्यात धूंद होणं…..!

सौरभने लग्नानंतरही महिनाभर सूट्टी काढली होती….नाही म्हणायला कंपनीचा ओनर अॅन्ड डायरेक्टर असल्याने त्याला कंपनीतून काॅल यायचे. पण मनस्वीला घरी एकटं सोडून जायची सौरभला ईच्छा व्हायची नाही. त्यामूळे तो शक्यतो घरूनच सगळ काम सांभाळत होता.

दिवस भरभर जात होते…..सौरभ घरात असल्यामूळे; तो  घेत असलेल्या काळजीमुळे मनस्वीला सार्‍या जगाचा विसर पडला होता…..!

त्या दोघांनाही एकमेकांची इतकी सवय झाली होती की मनस्वी दोन दिवस सणासाठी माहेरी गेली तरी दोघांनाही ऐकमेकांशिवाय करमायचं नाही. पहिल्यावहिल्या प्रत्येक सणात आणि एकमेकांत रंगलेल्या प्रेमात लग्न होऊन एक वर्ष झालेलंही समजत नाही.
म्हणतात ना देव सुख देतो तेव्हा तो भरभरून देतो….तसच काहीस झाल होतं मनस्वीच्या बाबतीत…!

बघता-बघता लग्नाचा पहिला वाढदिवस येऊन ठेपतो. त्या वर्षभरात सौरभने मनस्वीला खूप फिरवल होतं….तिची प्रत्येक इच्छा तिने बोलून न दाखवताच पूर्ण केली होती. मनस्वीच्या चेहर्‍यावर हास्याची एक लकेर पाहण्यासाठी सौरभ काहीही करायला तयार होता. मनस्वी सौरभच्या प्रेमात स्वतला विसरून गेली होती. मधुनमधून तिला एकेकाळी तिने तिच्या स्वप्नासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण होई पण आयुष्यभराचा जोडीदार जर चांगला असेल, भरभरून प्रेम करणारा असेल तर आयुष्यात आणखी काय हवं हे तिच्या आईचे शब्द तिला आठवायचे आणि मनस्वी पुन्हा संसारात रमून जायची…..!

सौरभ लगाच्या पहिल्या वाढदिवसाचे सेलीब्रेशन करण्याविषयी मनस्वीच मत घेतो…..पण मनस्वी सौरभला समजावते आणि नको ऊगीच मोठा प्रोग्रॅम करून पैसे घालवण्याऐवजी आपण ते पैसे अनाथआश्रमाला देवूयात अस सूचवते.

सौरभ सुरूवातीला आडेवेढे घेतो…..मनस्वी त्याला “खर म्हणजे मला आपल लग्नही रजिस्टरच करायच होतं….पण तूझ्या घरचं हे पहिलचं लग्न होतं….आई-बाबांचही स्वप्न होतं की त्यांच्या मोठ्या मूलाच लग्न खूप धुमधडाक्यात व्हावं……म्हणून तेव्हा मी काही बोलले नाही…..पण सौरभ मला अस वाटतयं आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना…..मग आपण आपल्या घरातच मस्तपैकी एकदम शांततेत सेलीब्रेट करूयात.”

सौरभ “ओके……मॅडम. तूझी आइडिया आवडली मला…मी आपल्या कंपनी मॅनेजरला जवळच्या अनाथआश्रमाची चौकशी करायला लावतो.”

मनस्वीला खूप बरं वाटतं….वायफळ होणारा खर्च टळणार होता. बरोबरच खूप वर्षांपासून अनाथआश्रमाला मदत  करण्याची तिची असणारी ईच्छा पूर्ण होणार होती….!

राञी बारा वाजता…..मनस्वीने स्वतच्या हाताने बनवलेला केक कट करून सौरभ आणि मनस्वी एकमेकांना भरवतात आणि अत्यंत साध्या पध्दतीने लग्नाचा पहिलाच वाढदिवस साजरा करतात. तरिही सौरभने मनस्वीसाठी अमेरीकन डायमंड असलेला सोन्याचा नेकलेस गिफ्ट म्हणून आणला होता. मनस्वीला तो खूप आवडतो. तसही मनस्वीला माहितच होतं आपण कितीही नको म्हटलं तरी सौरभ थोडी ना ऐकणार होता…..!

सकाळी लवकर ऊठून सौरभ आणि मनस्वी आवरून पहिल्यांदा देवघरात जावून देवाचा आणि नंतर आई-बाबांचा आशीर्वाद घेतात….मालतीताई आणि सदाशीवरावांनी मिळून मनस्वी आणि सौरभसाठी ‘न्यू कार’ गिफ्ट आणून ठेवली होती….मालतीताईंनी गाडीची चावी मनस्वीच्या हातात ठेवली….मनस्वी सौरभकडे पाहते. सौरभ डोळ्यानेच मनस्वीला असूदे घे म्हटल्याने मनस्वी ती चावी घेते.

नंतर दोघेही न्यू कार घेऊन अनाथआश्रम गाठतात. जाताना तिथे असणार्‍या मूलांसाठी खूप सारी खेळणी, कपडे, खाऊ आणि केक घेऊन जातात.

तिथे गेल्यानंतर त्या निरागस जीवांना हसताना, खेळताना पाहून मनस्वीच मन हेलावून जातं. एक बाळ तर फक्त पंधरा दिवसांच होतं….पाळण्यात ठेवल होतं त्याला. त्या चिमूकल्या जीवाला पाहून मनस्वीला जाणवतं की कोणाचाच आधार नसणार्‍या या चिमुकल्या जीवापुढे…. इतके दिवस ज्या दूखाला आपण कवटाळून बसलो आहे ते दुख किती छोटस आहे……!!

नाही इथूनपूढे कसही कोणतही संकट आल तरी रडत न बसता हसत त्याच्याशी दोन हात करायचे….संकटाला तोंड द्यायचं…..!

सौरभ आणि मनस्वी अनाथआश्रमात लग्नाचा वाढदिवस साजरा करून घरी येतात.

मनस्वीला गाडीत बसल्यापासूनच मळमळल्यासारख होत होतं…..पण त्या चिमूकल्या अनाथ बालकांना भेटून, त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचा आनंद लाभून ती इतकी खूष झाली होती की ती शारीरीक अस्वस्थतेकडे दूर्लक्ष करते…..पण घरी पोहचल्या पोहचल्या तिला ओमेटींग येत असल्याच फील होऊन ती गाडीतून ऊतरली की लगेच घरात निघून जाते.

सौरभला काहीच समजत नाही. तो गाडी पार्क करून  “मनस्वी….काय झाल?” म्हणत तिच्या मागे धावतो. घरात सदाशीवराव आणि मालतीताई त्या दोघांची वाट पाहत बसले होते. सूनबाई अशा काहीच न बोलता डायरेक्ट वरती बेडरूमध्ये का निघून गेल्या हे त्यांनाही समजत नाही. सौरभही काहीच न बोलता मनस्वीच्या पाठीमागे जिना चढून वरती जातो…..पाहतो तर मनस्वी बाथरूममधून बाहेर येत होती. तिच्या चेहर्‍यावरती प्रचंड थकवा दिसत होता…..डोळे पाण्याने लाल झाले होते.

सौरभ हात देऊन मनस्वीला बेडवरती बसवतो…..आणि मनस्वीला काय होतय? अचानक तब्येत कशी बिघडली? असे प्रश्न विचारतो….मनस्वी सौरभच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि सौरभला “माझ्या केसांतून हात फिरव फक्त….मला खूप कसतरी होतं आहे. कस ते माहित नाही पण गरगरल्यासारखं होत आहे.”

सौरभ मनस्वीच्या डोक्यातून हात फिरवत “रिलॅक्स मनस्वी…..मी फॅमिली डाॅक्टरांना बोलवतो. तू बेडला मागे टेकून बस.”

मनस्वी “नाही सौरभ….तू जवळच बस.”

सौरभ “ओके….बसतो इथेच बसतो.”

मनस्वी आणि सौरभ असे अचानक एकामागोमाग पळत गेले आणि अजून खालीही आले नाहीत….त्यामूळे काळजी वाटून मालतीताई आणि सदाशीवराव वरती येतात.

त्या दोघांना एकदम अस आलेलं पाहुन मनस्वी सौरभपासुन थोडी बाजूला सरकून बसते.

मालतीताई घाबरून सौरभला काय झाल ते विचारतात. सौरभ सगळ व्यवस्थीत सांगतो…..सदाशीवराव डाॅक्टरांना बोलावून घेतात. मालतीताईंच्या लक्षात आल होतं पण खाञीशीर नाही म्हणून त्या काहीच बोलत नाहीत.

डाॅक्टर येऊन मनस्वीला चेक करतात आणि सर्वांना “अभिनंदन…..तूमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे.”

मालतीताई आणि सदाशीवरावांना खूप आनंद होतो. सौरभ मनस्वीकडे पाहतो. दोघांच्याही डोळ्यात आनंदअश्रू तरळले होते…..!

सदाशीवराव डाॅक्टरांना सोडायला जातात…..तर मालतीताई देवापुढे साखर ठेवून येते म्हणून तिथून जातात.

सौरभ आनंदाने ऊड्याच मारायचा बाकी होता. तो मनस्वीजवळ जावून बसतो…..मनस्वीच्या चेहर्‍यावरून हात फिरवतो आणि तिचे दोन्ही हात हातात घेऊन त्यावरती ओठ टेकवतो व मनस्वीला “थॅंन्क्यू मनस्वी…..लग्नाच्या वाढदिवसादिवशी तू खूप मोठ गिफ्ट दिलस मला…..आय रेअली लव्ह यू…!”

मनस्वी सौरभचा आनंदी चेहरा पाहून “लव्ह यू टू….” म्हणून सौरभच्या मांडीवर डोकं ठेवते. सौरभ कितीतरी वेळ तसाच मनस्वीच्या केसांतून हात फिरवत राहतो.

आता लवकरच ईनामदार फॅमिलीत दुडूदुडू पळणारी चिमूकली पावलं येणार होती…..!!

©मधुदिप ब्लाॅग्ज

फोटो_साभार_गुगल

Previous Post

सुटलेली_ती…भाग ३९

Next Post

“Dopamine” म्हणजे काय???

madhuri deepak patil

madhuri deepak patil

मी एक ईंंजिनिअर असून जाॅॅब करत नाही कारण फर्स्ट प्रायोरिटी फॅॅमिली....आत्तापर्यंंच्या आयुष्यात खुप चढ-ऊतार पाहिले आहेत त्यामूळे लिहायला प्रेरणा मिळाली. माझ लिखाण माझ्यासाठी पॅॅशन आहे आणि माझ आयुष्य माझ्यासाठी खुप मोठी देणगी आहे त्यामुळे दोन्हीही भरभरून जगतेय.

Next Post
“Dopamine” म्हणजे काय???

"Dopamine" म्हणजे काय???

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

नवीन पोस्ट

“लव्हिंग हाऊस”
आत्मविश्वास

“लव्हिंग हाऊस”

by madhuri deepak patil
February 3, 2023
0

Alexa नावाची पंचवीस वर्षांची ही मेड पाहयला गेल तर वेल एज्युकेटेड मुलगी परंतु; काही कारणाने नवर्‍याशी तीच भांडण झाल्याने तिने...

Read more
“सगळी सोंग आणता येतात पण पैशाच सोंग आणता येत नाही”
आठवणी

“बंदे की मेहनत को किस्मत का सलाम”

December 14, 2022
“मूव्ह अहेड…!!”
आनंद

“मूव्ह अहेड…!!”

December 3, 2022
“कुंकू”
आध्यात्मिक

“कुंकू”

November 10, 2022
सुटलेली_ती….!!
सामाजिक

सुटलेली_ती….!!!

September 13, 2022
“Dopamine” म्हणजे काय???
आरोग्य

“Dopamine” म्हणजे काय???

September 8, 2022
सुटलेली_ती….!!
सामाजिक

सुटलेली_ती…भाग ४१

August 16, 2022
सुटलेली_ती….!!
सामाजिक

सुटलेली_ती…भाग ३९

August 16, 2022
सुटलेली_ती….!!
प्रेम

सुटलेली_ती….भाग १६

July 18, 2022
“आजची गरज-निर्वीचारिता”
आध्यात्मिक

“आजची गरज-निर्वीचारिता”

July 13, 2022
कौटूंबिक

सुटलेली_ती….भाग ४

July 13, 2022
Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Madhudeep All Rights Reserved

No Result
View All Result
  • होम
  • आठवणी
  • सामाजिक
  • अभ्यास
  • स्ञीवादी
  • प्रेम
  • आत्मविश्वास
  • आरोग्य
  • नवरा-बायको
  • पालकत्व
  • प्रेग्नंसी

© 2021 Madhudeep All Rights Reserved