Friday, February 3, 2023
मधुदीप
  • होम
  • आठवणी
  • सामाजिक
  • अभ्यास
  • स्ञीवादी
  • प्रेम
  • आत्मविश्वास
  • आरोग्य
  • नवरा-बायको
  • पालकत्व
  • प्रेग्नंसी
No Result
View All Result
मधुदीप
No Result
View All Result

सुटलेली_ती…भाग ३९

madhuri deepak patil by madhuri deepak patil
August 16, 2022
in सामाजिक
0
सुटलेली_ती….!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाग ३८ इथे वाचा:https://madhudeep.com/?p=74

“दुर्गा-व्हिला” मध्ये मनस्वी आणि सौरभचं मोठ्या थाटात स्वागत होतं…..मनस्वी ऊखाणा घेऊन माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलाने घरात प्रवेश करते. ‘दुर्गा-व्हिला’ मध्ये ती पहिल्यांदाच आली होती. नाही म्हणायला तिने सौरभ पाठवत असलेल्या फोटोत घराची झलक पाहीली होती….. पण प्रत्यक्षात ते इतकं अलिशान आहे, याचा तिला अंदाज नव्हता.

सौरभनेही कधी  कुठल्या गोष्टीबाबत बडेजाव आणला नव्हता की त्याविषयी मनस्वीपुढे फुशारकी मारली नव्हती. मग त्याने स्वत पायावर उभा केलेली कंपनी असो, घर असो वा गाडी असो. इतकच कायपण आजुबाजूच्या समाजात त्यांची असणारी इमेज, समाजसेवेसाठी ते करत असलेली मदत याही बाबतीत सौरभने तिला काही सांगितल नव्हतं….मनस्वीने आतापर्यंत फक्त ऐकल होतं की ज्याच्याजवळ जे असतं त्याला त्याची जाहिरात करायची गरज पडत नाही पण आज प्रत्यक्षात तिला त्याचा अनूभव आला होता…त्यामुळे सौरभप्रती तिच्या मनातील आदर जास्तच वाढला होता…..!

अनन्या, मनस्वी आणि तिच्याबरोबर पाठराखीण म्हणून आलेल्या सुवर्णाआंन्टीला घरात बसायला सांगते. मागच्यावेळी मनूबरोबर कपडे खरेदीसाठी साधनाला पाठवलतं मग मनूची पाठराखीण म्हणून मीच जाईन अस सुवर्णाआंन्टीने मीराताई आणि माधवरावांकडून लग्नाच्या पंधरा दिवस अगोदरच कबूल करून घेतलं होतं.

घरातील नोकराकरवी सुवर्णाआंन्टींना चहा द्यायला सांगून मालतीताई मनस्वी आणि सौरभला घरातील देवघराच्या पाया पडण्यासाठी घेऊन जातात.

चहा घेत-घेत सुवर्णाआंन्टी घराचा एकुणएक कोपरा न्याहळत होती. घरातील देवाच्या पाया पडुन झाल्यावर अनन्या सौरभला मनस्वीला तुमची रूम दाखव म्हणून सांगते. सौरभ मनस्वीला जिना वरती चढायला सांगून त्याच्याबरोबर मनूला वरच्या मजल्यावरती घेऊन जातो….रूमचा दरवाजा ओपन करून मनस्वीला “वेलकम मिसेस मनस्वी सौरभ ईनामदार…..आमच्या या छोट्याशा विश्वात तुमचं स्वागत आहे…!” अस म्हणून मनस्वीपुढे गुलाबाच फूल पकडतो.

मनस्वी स्माईल देऊन गुलाबाच फूल घेते आणि सौरभला “थॅंन्क्यू” म्हणते. पाहताक्षणी मनस्वीला सौरभची रूम आवडते. अगदी तिच्या स्वप्नात यायची; अगदी तशीच होती…..हवेशीर, ऐसपैस…लागूनच मोठी जवळजवळ एका रूमएवढी गॅलरी…त्याला मोठमोठे कर्टन्स….अनेक प्रकारच्या फुलांच्या कुंड्या ठेवलेली….. हिरवागार गर्द मनीप्लाॅन्ट…बरोबरच हायली रिच फर्निचर….तिला जशी हवी तशी होती एकदम.
मनस्वी सौरभला “रूम खूप छान आहे आहे आणि ठेवलेय देखील तितकीच छान…..!”

सौरभ मनस्वीला “जमेल तशी ठेवली आहे…पण आता ही तूझीही रूम आहे. त्यामूळे तुला जशी हवी तशी तू ठेवू शकतेस, वाटल्यास त्यात बदलही करू शकतेस…ओके?”

“ओके….बदल तर नक्कीच करेन मी. मला आवडतं घर सजवायला…!”

“मलाही आवडतील ते बदल….बिनधास्त कर.”

सौरभ आणि मनस्वी घर पाहून खाली येतात. मालतीताई मनस्वीला आणि सुवर्णाआंन्टीला फ्रेश व्हायला सांगतात आणि राञीच्या जेवणात काय मेन्यू बनवायचा ते  सांगण्यासाठी किचनमध्ये निघून जातात. अनन्या मनस्वी आणि सुवर्णाआंन्टीची व्यवस्था गेस्टरूममध्ये करते. दूसर्‍यादिवशी सत्यनारायण पुजा ठेवली होती. ती पार पडेपर्यंत मनस्वीला गेस्टरूममध्येच राहव लागणार होतं.

मनस्वी, सौरभ आणि एकूणच घरचे सगळेजण खूप कंटाळले होते. सर्वजण जेवण करून लवकर झोपी जातात.  दूसर्‍यादिवशी सकाळी लवकरच सगळ्यांची लगबग सुरू होते. मनस्वी आणि सौरभला एकञ अंघोळ घालणे, कूंकवाच्या पाण्यात नाणं शोधणे, एकमेकांच्या मुठीतून अंगठी सोडवणे….असे सगळे प्रोग्रॅम होतात. या सगळ्या रीतीभाती निभवणं सुरूवातीला मनस्वीला खूप अवघड वाटल होतं. पण नंतर त्या सगळ्या कार्यक्रमात अनन्या, मंदार, सौरभचे जवळचे मिञ, घरातील माणसे यांच्यामुळे धमाल आली होती.

घरातले सगळेजण खुप खूष होते. घरात आनंदी वातावरण झाल होतं. आपल्या घरात मनस्वीचा वास सौरभला वेगळाच आनंद देऊन जात होता. सौरभ अप्रत्यक्षरीत्या मनस्वीची काळजी घेत होता. तिला आपल्या घरात कंम्फर्टेबल वाटाव यासाठी तो प्रयत्न करायचा…बाकी कोणाला समजू न समजू पण मनस्वीला ते समजत होतं….!

संध्याकाळी चार वाजता सत्यनारायण पूजा पार पडते. पूजेसाठी माहेरहून मनस्वीचे पप्पा आणि मामा आहेर घेऊन आले होते. सौरभ आणि मनस्वीची खर्‍याअर्थाने कूलदैवत, अराध्यदैवत यांचे आशीर्वाद घेऊन सहजीवनाला सुरूवात होणार होती.

दुसर्‍यादिवशी मनस्वीची चुलती साधनाआंन्टी, माधवराव व मनस्वीचे मामा यांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी सौरभ ड्राईव्हरसह गाडी पाठवून देतो. साधनाआंन्टी गेल्याने मनस्वीला नवीन घरी, नवीन माणसांमध्ये वावरणं अवघडल्यासारख वाटू लागतं.

सौरभ मनस्वीला समजावतो “मी आहे ना मग कशाला टेन्शन घेतेयस. तुला घरची आठवण आली की माझ्याजवळ मनमोकळ करत जा….मी आहे ना…!”

तेव्हड्यात अनन्या तिथे येते “ओहो….आम्ही पण आहे बर वहिनी इथे….तूझ्याशी बोलायला. चल मी तूला आपल गार्डन दाखवते…तूला अजिबात बोअर होणार नाही.”

सौरभ हळूच “कबाब में हड्डी….!”

मनस्वी आणि अनन्या दोघींनाही ऐकू येऊन अनन्या लटके रागावून तिथून निघून जाते. मनस्वी सौरभकडे पाहून गालात हसते.

“आपण आपल्या फार्महाऊसवर जावून येऊयात. तूला आईसक्रीम आवडतं ना?” सौरभ

मनस्वी काहीसा विचार करून “पण…..अस लगेच घराबाहेर , घरातील कोणालाही न विचारता कस जाणार? निदान आईंना तरी विचारूयात?”

सौरभ “डोन्ट वरी….कोणी काही म्हणणार नाही. आपल्या घरचं वातावरण वेगळ आहे. कोणी कोणाला काहीही करण्याविषयी टोकतं नाही.”

मनस्वी सौरभला “बरं….म्हणते आणि तिचे साहीत्य ठेवलेल्या गेस्टरूममध्ये निघून जाते.”

मनस्वी सौरभला मी आवरते म्हणते खरी पण पुन्हा एकदा घरचे काय म्हणतील म्हणून ती मालतीताईंना शोधत किचनमध्ये जावून पोहचते. मालतीताई तिथे ड्रायफ्रूट्स भाजून त्याची पेस्ट कशी बनवायची ते स्वयंपाकीणबाईला सांगत होत्या.

मनस्वी जरा दबकतच मालतीताईंना सौरभचा प्लाॅन सांगते. त्यावर मालतीताई हसून “अगं मनू…..त्यात मला काय विचारायचय…सौरभने सांगितल ना मग झाल. तूमच नवीन लग्न झाल आहे…असही लग्न, त्यानंतर देवदर्शन, पूजा, पाहूणे यामूळे तूम्हाला एकमेकांशी वेळ घालवता आला नाही. जरा बाहेर फिरून आल्यावरती तूलाही छान वाटेल.”

मनस्वी “ठीक आहे….लवकर येऊ आम्ही.” म्हणून वळते.

मालतीताई मनस्वीला हाक मारतात “तूला हवतर तू ड्रेस घालू शकतेस…..”

मनस्वी “नाही आई….मी येताना ड्रेस नाहीत आणले. साडीच घालेन.”

मालतीताई हसून “बरररं…तूला जस ठीक वाटेल.”

सासूबाईंची परवानगी घेतल्यानंतर मनस्वीला बाहेर जाणं योग्य वाटतं….ती किचनमधून बाहेर पडते. तोच सौरभ तिथेच ऊभा राहीला होता. त्याने सगळकाही ऐकल होतं. त्याला मनस्वीच जास्तच कौतूक वाटतं की मनस्वी आपल्या घरच्यांचा कीती विचार करते, आईला तिने किती पध्दतशीरपणे बाहेर जाण्याबद्दल विचारलं.
तसपाहता शिकलेल्या मूली अशाच असतात. त्यांचे नवरे जर त्यांच मन राखत असतील तर त्याच्या घरच्यांच मन राखायला मुलींना सांगाव लागत नाही….!

मनस्वी मस्त तयार होते. स्कीन कलरची साडी घालून त्यावरती पिंक कलरचा ब्लाऊज घालते. गळ्यात लांब मंगळसुञ, कानात छानसं सोन्याच कानातल घालते जे की तिला सुनमुख म्हणून मालतीताईंनी दिल होतं. ओठांवर हलकीशी चेरी कलरची लिपस्टीक लावून भांगात सिंधूर भरते. मनस्वीच आवरलय की नाही हे पाहण्यासाठी सौरभ तिच्या रूमबाहेर ऊभा राहून दार नाॅक करून आत येतो.
मनस्वीच साडीतील सालस, मन वेधणारा रूप त्याच्या मनाचा ठाव घेतं. तिच्या पैंजणाचा आवाज सौरभला जणू तिच्याकडे खेचत होता. तर पायातील जोडव्यांनी झखडलेली तिची नाजूक बोटं जमिनीलाही लाजवत असावी.

सौरभला अस अचानक आलेलं पाहून मनस्वी गडबडते. ऊगीच काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते….आणि सौरभला “मी येतचं होते….” म्हणुन दूसरीकडे तोंड वळवते.

सौरभ तिच्या आणखी जवळ जावून “हो का?” अस म्हणत स्वतचे दोन्ही हात तिच्या खांद्यावरून मागे नेतो आणि तिच्या ब्लाऊजच्या न बांधलेल्या नाॅड अलगद मनस्वीला स्पर्श न करता बांधतो……मनस्वी जागेवरच ऊभा राहून खाली जमिनीकडे पाहते….आणि सौरभला “थॅंन्क्यू” म्हणते.

 

सौरभ तिला “मला सांग…..तू या गेस्ट रूममधून कधी शिफ्ट होणार आहेस….म्हणजे आपल्या रूममध्ये कधी येणार आहेस?”

मनस्वी सौरभचा ईशारा समजून हसते आणि त्याची गंमत करते “शिफ्टींग कशाला? आणि आपली रूम कोणती? मला इथेच छान वाटतं आहे…!”

सौरभ तोंड पाडून शांत बसतो. मनस्वी त्याच्या केसांतून हात फिरवते आणि मोठ्याने हसते.

सौरभ मुड बदलून मनस्वीच्या हसण्याचा आवाज कानात साठवतो आणि
“तुम्हारी इसी हॅंसी के लिए…तो हम तरसते है….
तूम कुछ कहो ना कहो,
तुम्हारे दिल की हर बात समज जाते है…”

मनस्वी सौरभला “वाह…..क्या बात…क्या बात….क्या बात…!!!” करून प्रतिसिद देते.

दोघेही घरातून बाहेर पडून फार्महाऊसवरती पोहचतात. मनस्वीला फार्महाऊस खूप आवडतं…..मनस्वी नको म्हणत असूनही सौरभ तिच्या मागे लागून तिचे विविध पोझसह फोटोझ काढतो. त्या दोघांची आजच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था फार्महाऊसवरती करण्यात आली होती.

तिथे केअरटेकर म्हणून असणारे रामूकाका आणि शांताबाई नवीन सूनबाईं म्हणून मनस्वीच खूप छान स्वागत करतात….सौरभला कंपनीतून फोन आल्याने तो थोडावेळ बिझी होऊन जातो. तेव्हड्या वेळात शांताबाई मनस्वीला त्यांची शेती, शेतातील विविध पीकं, घोड्यांचा तबेला, पाळलेले ससे, पिंजर्‍यातील विविधरंगी लव्हबर्डस दाखवते…..मनस्वीला सगळच खूप आवडतं.

सौरभ मनस्वीला लागूनच मागच्या साईडला स्वत सौरभने लावलेल्या अनेक प्रकारच्या गूलाबाच्या फूलांची झाडे दाखवून मनस्वीच्या आवडीच्या कलरची खूप सारी फूले तिला स्वत तोडून देतो…. त्या फूलांच्या सुगंधाने मनस्वीचा दोन-तीन दिवसांचा थकवा चूटकीसरशी निघून जातो. कितीही केलं तरी निसर्ग जो आनंद देऊ शकतो….तो आनंद  काही केल्या किंमती वस्तू वा सोने-नाणे देवू शकत नाहीत हेच खरं….!!

बंगलोच्या मागूनच पाण्याचा मोठा झरा शेतातील पाटाला जावून मिळत होता. तशी व्यवस्थाच केली होती. तिथे सौरभ आणि मनस्वी पाण्यात पाय बुडवून गप्पा मारत; कितीतरी वेळ  बसून राहतात. सध्याच फार्महाऊस हे कधीकाळचं सौरभच्या आजोबांच घर होतं….सौरभच बालपणही तिथेच गेलं होतं. नंतर सदाशिवरावांनी “दुर्गा-व्हीला” बांधल आणि ते टिकवण्याच व पुढे वाढवण्याच काम सौरभ आणि मंदार करत होते….याचीच प्रचिती म्हणजे सौरभने स्वतच्या कष्टातून ऊभा केलेली कंपनी…!

संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. मनस्वी सौरभला “चल निघूयात….मस्त वाटलं इथे येऊन.”

सौरभ मनस्वीला “बसूया ना जरा आणखीवेळ…..माझ खूप दिवसांपासूनच स्वप्न होतं; लग्न झाल्यावरती तूला पहिल्यांदा इथे घेऊन यायचंं…खूप गप्पा मारायच्या.”

मनस्वी सौरभला समजावत “पुन्हा येऊयात…..पण आता ऊशीर होतोय….मला तूला दूखवायच नाही…पण समजून घे.”

सौरभ जास्त आडेवेडे न घेता “ओके मॅडम….निघूयात.”

दोघेही घरी पोहचतात. घरात कोणीच दिसत नव्हतं. मनस्वी फ्रेश होऊन किचनमध्ये जाते….तर मालतीताई आणि सदाशिवराव कुठेतरी, कोणाच्यातरी उद्घाटनासाठी गेलेत अस समजलं. अनन्याच्या रूममध्ये पाहते तर तिथेही कोणी नव्हतं. मंदार आणि सौरभही चहा पिऊन लगेच गायब झाले होते. मिञांकडे वैगेरे गेले असतील अस मनूला वाटून ती पुन्हा तिच्या रूममध्ये जावून बसते.

अनन्या मनस्वीची ही शोधाशोध हळूच पडद्यामागून पाहत होती पण ती काहिच बोलत नाही. कारण सौरभ, अनन्या आणि मंदार सौरभच्या बेडरूममध्ये होते. सौरभची रूम डेकोरेट करत होते….आफ्टरआॅल सौरभ आणि मनस्वीची लग्नानंतरची ती पहिली राञ असणार होती…..!!

क्रमश:

पुढील भाग लवकरच…..

©मधुदिप ब्लाॅग्ज

फोटो_साभार_गुगल

Previous Post

सुटलेली_ती….भाग १६

Next Post

सुटलेली_ती…भाग ४१

madhuri deepak patil

madhuri deepak patil

मी एक ईंंजिनिअर असून जाॅॅब करत नाही कारण फर्स्ट प्रायोरिटी फॅॅमिली....आत्तापर्यंंच्या आयुष्यात खुप चढ-ऊतार पाहिले आहेत त्यामूळे लिहायला प्रेरणा मिळाली. माझ लिखाण माझ्यासाठी पॅॅशन आहे आणि माझ आयुष्य माझ्यासाठी खुप मोठी देणगी आहे त्यामुळे दोन्हीही भरभरून जगतेय.

Next Post
सुटलेली_ती….!!

सुटलेली_ती...भाग ४१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

नवीन पोस्ट

“लव्हिंग हाऊस”
आत्मविश्वास

“लव्हिंग हाऊस”

by madhuri deepak patil
February 3, 2023
0

Alexa नावाची पंचवीस वर्षांची ही मेड पाहयला गेल तर वेल एज्युकेटेड मुलगी परंतु; काही कारणाने नवर्‍याशी तीच भांडण झाल्याने तिने...

Read more
“सगळी सोंग आणता येतात पण पैशाच सोंग आणता येत नाही”
आठवणी

“बंदे की मेहनत को किस्मत का सलाम”

December 14, 2022
“मूव्ह अहेड…!!”
आनंद

“मूव्ह अहेड…!!”

December 3, 2022
“कुंकू”
आध्यात्मिक

“कुंकू”

November 10, 2022
सुटलेली_ती….!!
सामाजिक

सुटलेली_ती….!!!

September 13, 2022
“Dopamine” म्हणजे काय???
आरोग्य

“Dopamine” म्हणजे काय???

September 8, 2022
सुटलेली_ती….!!
सामाजिक

सुटलेली_ती…भाग ४१

August 16, 2022
सुटलेली_ती….!!
सामाजिक

सुटलेली_ती…भाग ३९

August 16, 2022
सुटलेली_ती….!!
प्रेम

सुटलेली_ती….भाग १६

July 18, 2022
“आजची गरज-निर्वीचारिता”
आध्यात्मिक

“आजची गरज-निर्वीचारिता”

July 13, 2022
कौटूंबिक

सुटलेली_ती….भाग ४

July 13, 2022
Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Madhudeep All Rights Reserved

No Result
View All Result
  • होम
  • आठवणी
  • सामाजिक
  • अभ्यास
  • स्ञीवादी
  • प्रेम
  • आत्मविश्वास
  • आरोग्य
  • नवरा-बायको
  • पालकत्व
  • प्रेग्नंसी

© 2021 Madhudeep All Rights Reserved