Friday, February 3, 2023
मधुदीप
  • होम
  • आठवणी
  • सामाजिक
  • अभ्यास
  • स्ञीवादी
  • प्रेम
  • आत्मविश्वास
  • आरोग्य
  • नवरा-बायको
  • पालकत्व
  • प्रेग्नंसी
No Result
View All Result
मधुदीप
No Result
View All Result

“आजची गरज-निर्वीचारिता”

जागतिक योग दिवस विशेष-२१जून

madhuri deepak patil by madhuri deepak patil
July 13, 2022
in आध्यात्मिक
2
“आजची गरज-निर्वीचारिता”
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बर्‍याचवेळा मला पडणारा प्रश्न म्हणजे आपल्या डोक्यात एवढे सारे विचार येतात कुठून? बर हा प्रश्न काही आत्ता माझ्या मनात आला नाही. तर लहानपणापासूनच येतो…आणि जसजशी मी मोठी झाले तसं याच ऊत्तर खुपच खोलात जाऊन शोधाव लागेल…..अस मला जाणवू लागलं.

किती बरं विचार करतो आपण…..एक विचार डोक्यात येतोय न येतोय तोच पुढचा विचार पहिल्या विचाराची जागा घेतो….तर दुसर्‍या विचाराची जागा तिसरा विचार कधी घेतो तेही नाही समजत. काही विचारांचा तर आपल्या प्रत्यक्ष आयुष्याशी काहीच संबंध नसतो; तरीही ते विचार आपल्या डोक्यात फेर धरतात…काहीवेळा तर आपल्या मनात ऊगीच आपल्या समोरून जाणार्‍या अनोळखी व्यक्तीविषयी कितीतरी विचार येऊन जातात आणि आपण त्यावर आणखी विचार करून त्या अनोळख्या व्यक्तीविषयी काल्पनिक धागे गुंडाळू लागतो…आणि हे सगळ कुठ होत असतं तर ते आपल्या डोक्यात!!

कधी-कधी तर “आपण एवढा विचार का करतो?” या प्रश्नावरचं कितीतरी वेळ मनात विचार करत बसतो आणि शेवटी ऊत्तर न सापडून आपली निराशा होते.

राञी एखादवेळी खुपवेळ झोपच नाही लागत, तेव्हाही आपण विचार करत बसतो की नाही…. माझ ऊद्या आॅफिस, काॅलेज आहे मला झोपलच पाहीजे…..पण तरीही झोप येत नसेल तर पुन्हा आपल्या मनात असा विचार येतो की नाही आत्ता आपण लवकर झोपलो तर लवकर ऊठू….अशा एक ना अनेक विचारांनी मनात गर्दी केली की मग परत माझच मन मला म्हणत अग बाई किती विचार करतेस…हो पण मग कसे घालवू मी हे विचार? कशाप्रकारे मन निर्विचारात घेऊन जाऊ?

अनेक प्रयत्नानंतर दोन-तीन महिन्यांपूर्वी मला या सर्व विचारांवरील ऊत्तर सापडल….ते म्हणजे “सहजयोग.” मी जेव्हा सहजयोग स्विकारला तेव्हाच मी निर्विचारीता मध्ये गेले…….शांत, सुखी, आनंदी फिल करू लागले……कसले विचार डोक्यात नसल्याची अनुभूती मला आली. डोक्यातून थंड हवेचे फवारे वाहू लागले……आणि तेव्हापासून श्री निर्मला माताजी माझं सर्वस्व बनल्या…..!!

मी एक लहान मुल आहे आणि परमपुज्य श्री माॅं निर्मला माताजी माझ्या आई आहेत याचा अनुभव मला आला. आयुष्यात मी का आणि कशासाठी या विनाकारण डोक्यातील विचारांना जागा दिली आहे; याची प्रत्यक्ष जाणीव मला झाली. मी- मी नसून एक शुद्ध आत्मा आहे…करता आणि करविता विधाता आहे….मग मी चिंता का करू? ही गोष्ट मला ऊमगली.

what is sahajyoga? सहजयोग हा जीवन जगण्याचा असा एक पैलू आहे जिथे तुम्हाला तुमच्या आतील व बाहेरील सर्व गोष्टी सोडून द्यायच्या आहेत….तुम्हाला निष्ठेने रहायच आहे, पूर्णपणे स्वतला अर्पण करायच आहे; अस कराल तर आणि तरच तुम्ही स्वतला ऊंचीवर पहाल !

माणसामधील राग,लोभ, अहंकार, असूया, कृतघ्नता, अनीती, दुर्बुद्धी, गैरकाम, अपराधीपणा, अपविञता…असे दुर्गुण सहजयोगतत्व अवलंबल्यामुळे आपोआप निघून जातात. अप्रत्यक्षपणे त्या व्यक्तीचा पूर्ण आत्मा शुध्द होतो आणि त्या माणसाकडून अवगुण, बाहेरील दिखावा या गोष्टी कायमच्या सोडून दिल्या जातात.
सहजयोगी व्यक्ती नोकरी, पैसा, प्रसिद्धी या गोष्टींच्या मागे न लागता, त्यासाठी चिंतीत न राहता पुर्णपणे समाधानी बनतो.

खूप जास्त विचार करणे “अहंकारा” चे लक्षण आहे….जे लोक खूप जास्त विचार करतात, ते कधीच समाधान प्राप्त करू शकत नाहीत. कारण असे लोक बडबड करण्यात, वाद-विवाद घालण्यात, स्वतला सिद्ध करण्यात आणि अतीविचार करण्यात स्वतची सगळी सकारात्मक ऊर्जा वाया घालवत असतात. अशा लोकांच्या मनावर विचारांनी पुर्णपणे कब्जा केलेला असतो. त्यासाठी स्वतच्या मनाला ठणकावून सांगायला हव की “हे मना तू विचार करू नकोस? कशासाठी करतोयस इतके विचार? दे सोडून दे सगळ त्या विधात्यावर……जेणेकरून आपण निर्विचारीता प्राप्त करू शकतोय.

निर्विचारीता मध्ये गेल्यावरती मला अनुभवायला मिळालेला एक महत्त्वाचा मुलमंञ म्हणजे “accept life as it is-as it is” थोडक्यात सांगायच तर आयुष्य आहे अस स्वीकारा…मग ते कसंही असो….. आहे अस स्वीकारायला शिकायला हव….बदला घ्यायच सोडून द्या, राग सोडा, अस्वस्थ व्हायच सोडा आणि स्वीकारायला शिका; मग पहा आपण त्याच परिस्थितीत कस हसतखेळत जगू….!

ज्या गोष्टींचा वा परिस्थीतीचा आपणाला ञास होतं होता त्याच गोष्टींकडे वा परिस्थीतीकडे एक साक्षीभाव ठेवून पाहिल्यास; तुमचे सगळे प्राॅब्लेम दूर होतील, तुमचे शञू नाहीसे होतील. तुमच आयुष्य खुप सुंदर होईल….!!

आणखी एक मला ऊमगलेला जीवन जगण्याचा चिरंतर ऊपाय म्हणजे….
“forgiveness-क्षमाशीलता”

खरंच का आपण एखाद्याला मनातून माफ करतो? एखादी व्यक्ती आपली हितचिंतक नसेल तर करतो का आपण त्याला माफ? विसरतो का त्याने आपल्याला दिलेलं दुख? सोडून देतो का आपण त्या व्यक्तीला काहीच न बोलता न प्रतित्तुर न देता? तर नाही…..म्हणून श्री माताजी म्हणतात माफ करा; जोपर्यंत आपण माफ करायला शिकत नाही तोपर्यंत आपण निर्विचार राहू शकत नाही. कारण समोरच्याने आपल्याला दुख दिल आहे या विचाराच ओझ कायम आपल्या मनावर असत….त्यामुळे आपली कार्यक्षमता कमी होते…आणि मग आपसूकच आपली प्रगती खुंटते. हे झाल माफ नाही केल तर….मग माफ केल तर काय होईल….नक्कीच आपला ऊत्कर्ष होईल…..ज्याच्या विषयी आपल्याला राग आहे, त्याला माफ केल्याने आपल्या डोक्यातील नकारात्मकतेची घाण निघून जाईल….महत्त्वाच म्हणजे डोक्यातील नकारात्मक विचार कमी झाल्याने, दुसर्‍या सकारात्मक विचारांना आत प्रवेश मिळेल आणि आपोआपच मन शुद्ध होऊन जाईल.

आपल्या निर्विचारीतामुळे “एखाद्याविषयी असुया वाटणे” या दुर्गुणावर आपण मात करू शकतोय……ज्याप्रमाणे एखाद्याच्या दुखात आपण सहभागी होतो त्याचप्रमाणे त्याच्या आनंदात, यशातही सहभागी होता आल पाहिजे.

मान्य आहे कदाचित सुरूवातील समोरच्याच यश पचवण कठिण जात असेल पण प्रयत्न करून तर पहा, खुप सोप होऊन जाईल….ऊलट समोरच्याच्या यशाने जेवढा ञास तुम्ही स्वत करून घ्याल तेवढा जास्त ञास तुम्हाला होत राहील….कारण यश मिळवणारा कायम पुढे-पुढे जाईल आणि तुम्ही ऊगीच स्वतला ञास करून घेत बसाल…..यावर सगळ्यात रामबाण ऊपाय म्हणजे दुसर्‍यांना मागे खेचून त्यांची रेषा कमी करण्यापेक्षा स्वतची रेषा मोठी करा…आपोआपच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहचाल.

“दिखावा……” तर अजिबातच नको आहे. दिखाव्यामुळे तुम्ही कधीही परम्यात्म्याशी कनेक्ट होऊ शकत नाही…..पण का आणि कशासाठी करायचा दिखावा….तुमच्या जवळ असलेल्या क्षणभंगुर गोष्टींसाठी? आपण या जगात येताना एकटे येतो आणि वर जाताना ही एकटच जायच आहे मग का करायचा हा असला दिखावा. म्हणूनच निर्विचारीता येण्यासाठी खुप साध सरळ ह्रद्य आणि शुध्द विचार हवे आहेत.

“गर्व” हा सर्वात मोठा दुर्गुण आहे. जो फक्त आणि फक्त सहजयोग केल्यानेच नष्ट होवू शकतो. तो घालवण्यासाठी प्रत्येक क्षणाला आपणाला स्वतच आत्मनिरीक्षण कराव लागतं. छोट्या-छोट्या गोष्टींबाबतीतही आपणाला आपण केवढे हूशार,शहाणे अस जेव्हा वाटू लागत; तेव्हा त्याचक्षणी आपण स्वतच्या ह्रद्यात डोकावून, आपणापेक्षाही या जगात खूप लोक हूशार, विद्वान आहेत हे मान्य केल्यास तो गर्व गळून पडेल……आणि आपल्यात जास्तीत-जास्त सुधारणा होण्यास मदत होईल….!

श्री माताजींच्या अनुभवातून सांगायच झाल तर, “मी निर्विचारीता अंगीकारल्यापासून हे सगळ विश्व मला माझ वाटतय…..या विश्वातील प्रत्येक बालक मला माझा वाटत आहे……या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी माझी आहे…..या विश्वात मानवजात ही एकच जात मला दिसत आहे. जणू विश्वची माझ कुटूंब झाल आहे….!!”

आज आपण जो जागतिक योगदिवस साजरा करतोय…..तो शारीरीकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी करत आहोत पण त्यामागे खरा हेतू हा मानसिकदृष्ट्या मजबूत होणे हा आहे….तोच आपण विसरत चाललो आहोत…..असो!!

प्रिय वाचकहो, तुम्हाला या निर्विचारीताचं महत्त्व सांगायच कारण म्हणजे आपल्या निम्म्यापेक्षा जास्त दुखाच कारण हे आपल्या डोक्यात येणारे ऊलटसुलट विचारच आहेत……तुम्ही हे विचार घालवून टाकले तर तुमची सगळी दुख दूर होतील…..एवढच नव्हे तर तुम्हाला खुष राहण्याचा मार्ग सापडेल….तुम्ही सहजयोग स्विकारा….हा सहजयोगच तुम्हाला निर्विचारा कडे घेऊन जाईल. सहजयोगाविषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असेल, निर्विचार कस व्हायच हे जाणून घ्यायच असेल तर तुम्ही पुणे प्रतिष्ठान श्री निर्मला माताजी या युट्यूब चॅनलला भेट द्या वा सहजयोग सेंटरला भेट द्या. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सहजयोग सेंटर ऊपलब्ध आहे आणि महत्वाच म्हणजे सहजयोग निशुल्क आहे…….धन्यवाद!!

तुम्ही भरभरून देत असलेल्या प्रतिसादामुळे लिहायला प्रोत्साहन मिळत…त्यामुळे लाईक, कमेंन्ट करून असाच प्रतिसाद देत रहा..तर चला तर मग आणखी असेच छान लेख/कथा वाचण्यासाठी मला फाॅलो करा.

हो आणखी एक म्हणजे वरती प्रोफाईलला subscribe करा म्हणजे mail व्दारे पुढच्या कथेचे/लेखाचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल.

प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

©माधुरी दिपक पाटील

फोटो_साभार_गुगल

अशाच कथा/लघुकथा/लेख वाचण्यासाठी माझ्या “रंग आयुष्याचे” या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा….धन्यवाद!

Previous Post

सुटलेली_ती….भाग ४

Next Post

सुटलेली_ती….भाग १६

madhuri deepak patil

madhuri deepak patil

मी एक ईंंजिनिअर असून जाॅॅब करत नाही कारण फर्स्ट प्रायोरिटी फॅॅमिली....आत्तापर्यंंच्या आयुष्यात खुप चढ-ऊतार पाहिले आहेत त्यामूळे लिहायला प्रेरणा मिळाली. माझ लिखाण माझ्यासाठी पॅॅशन आहे आणि माझ आयुष्य माझ्यासाठी खुप मोठी देणगी आहे त्यामुळे दोन्हीही भरभरून जगतेय.

Next Post
सुटलेली_ती….!!

सुटलेली_ती....भाग १६

Comments 2

  1. भारत गाडे says:
    July 11, 2022 at 7:57 am

    माधुरी, छान लिहिलं आहेस. आपल्यातले दुर्गुण सहज योगाने बाजूला सारून आनंदी जीवन कसं जगावं हे समजलं.

    Reply
    • madhuri deepak patil says:
      July 13, 2022 at 10:25 am

      Thank u so much….!!

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

नवीन पोस्ट

“लव्हिंग हाऊस”
आत्मविश्वास

“लव्हिंग हाऊस”

by madhuri deepak patil
February 3, 2023
0

Alexa नावाची पंचवीस वर्षांची ही मेड पाहयला गेल तर वेल एज्युकेटेड मुलगी परंतु; काही कारणाने नवर्‍याशी तीच भांडण झाल्याने तिने...

Read more
“सगळी सोंग आणता येतात पण पैशाच सोंग आणता येत नाही”
आठवणी

“बंदे की मेहनत को किस्मत का सलाम”

December 14, 2022
“मूव्ह अहेड…!!”
आनंद

“मूव्ह अहेड…!!”

December 3, 2022
“कुंकू”
आध्यात्मिक

“कुंकू”

November 10, 2022
सुटलेली_ती….!!
सामाजिक

सुटलेली_ती….!!!

September 13, 2022
“Dopamine” म्हणजे काय???
आरोग्य

“Dopamine” म्हणजे काय???

September 8, 2022
सुटलेली_ती….!!
सामाजिक

सुटलेली_ती…भाग ४१

August 16, 2022
सुटलेली_ती….!!
सामाजिक

सुटलेली_ती…भाग ३९

August 16, 2022
सुटलेली_ती….!!
प्रेम

सुटलेली_ती….भाग १६

July 18, 2022
“आजची गरज-निर्वीचारिता”
आध्यात्मिक

“आजची गरज-निर्वीचारिता”

July 13, 2022
कौटूंबिक

सुटलेली_ती….भाग ४

July 13, 2022
Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Madhudeep All Rights Reserved

No Result
View All Result
  • होम
  • आठवणी
  • सामाजिक
  • अभ्यास
  • स्ञीवादी
  • प्रेम
  • आत्मविश्वास
  • आरोग्य
  • नवरा-बायको
  • पालकत्व
  • प्रेग्नंसी

© 2021 Madhudeep All Rights Reserved