रमाताई पळत जाऊन प्रतापरावांना आधार देण्याचा प्रयत्न करतात…पण शेवटी प्रतापरावच ते कोणाचा आधार घेतील तर आतला पुरूषी अहंकार दुखावेल ना त्यांचा…स्वतच सोफ्याला पकडून बसतात….हातातला फोन खाली पडला होता…रमाताई तो ऊचलून टेबलवर ठेवतात.
इकडे प्रतापराव घामाने डबडबले होते, छातीची धडधड वाढली होती…तोंडातून शब्द फुटत नव्हते. पतीची अशी अवस्था पाहून हळव्या मनाच्या रमाताई जागीच जमिनीला थिजून ऊभा राहतात…तोपर्यंत मानसी जिना ऊतरून खाली येते…आई-आण्णांची अशी अवस्था पाहून घाबरते…एक हात पोटातल्या बाळाला लावून कशीबशी सूधीरला आवाज देत बेडरूम मध्ये जात असते;तोच फरशीवर पाय घसरून पडते…पोटात जोराची कळ येते आणि ती जोरात किंचाळते….तसा सुधीर घाबरून झोपेतून ऊठतो.
इकडे रमाताई भानावर येऊन मानसीकडे धाव घेतात….प्रतापराव अजून त्यांच्याच विचारचक्रात होते….सुधीरला काहीच कल्पना नव्हती घरात काय चालू आहे याची. मानसीला जमीनीवर अस पडलेल पाहून त्याच्या काळजात धस्स होत…त्याची झोप कुठल्याकुठे जाते…तो मानसीला हाॅलमध्ये आणून सोफ्यावर झोपवतो व अॅंब्यूलन्सला फोन लावतो….हे सगळ घडत आहे तरी आण्णा असे कसे शांत बसू शकतात असा प्रश्न सुधीरला पडतो…पण प्रसंगावधान ओळखून नेहमीप्रमाणे तो आण्णांकडे दुर्लक्ष करतो.
रमाताईंना समजत नव्हतं सुधीरबरोबर जावं की नवर्याजवळ थांबावं. सुधीरच्या आवाजाने त्या भानावर येतात. मानसीची फाईल आणि पाण्याची बाॅटल पिशवीत टाकून ती सुधीरकडे देतात. अॅम्बुलन्स दारात पोहचते….
मानसीला अॅडमीट केल जात..,, मानसीची प्रसुती होण्यासाठी अजून पंधरा दिवस बाकी होते पण ती पोटावर पडल्याने डाॅक्टर तिची प्रसुती करून अॅपरेशन कराव लागेल अस सुधीरला सांगतात व त्याच्याकडे एक फाॅर्म देऊन त्यावर सह्या कराव्या लागतील अस सांगतात.
सुधीर मनातून खूप घाबरला होता पण आता सध्या डाॅक्टर हेच त्याचे देव आहेत अशी स्वतच्या मनाची समजूत घालत तो फाॅर्मवर सह्या करतो. नर्सलोक मानसीला आॅपरेशन थेअटरमध्ये घेऊन जातात. सुधीर सगळा जीव मुठीत घेऊन आॅपरेशन थेअटर बाहेर चकरा मारत राहतो.
काहीवेळाने डाॅक्टर बाहेर येतात “मुलगा झाला आहे व बाळ आणि त्याची आई सुखरूप आहेत. काळजी करण्याचं काहीच कारण नाही” अस डाॅक्टरांनी सांगताच सुधीरचा जीव भांड्यात पडतो. तो आईला चल आत जावून मानसीला भेटूयात म्हणतो पण रमाताई “तु भेट अगोदर मग मी भेटते” म्हणून सुधीरला आत पाठवतात.
रमाताईंच्या मनात आण्णांविषयीची काळजी होती. मानसीविषयीच टेन्शन दुर झाल होतं पण आण्णांच टेन्शन होत त्यांना.
सुधीर बाळाला हातात घेऊन; एवढ छान गिफ्ट दिलस म्हणून मानसीला डोळ्यानेच थॅंन्क्यू बोलतो….मानसीही स्मित हास्य करून ते स्विकारते पण तिच्या मनात आण्णांविषयी हुरहूर होती…सुधीरने तिला विचारल असता ती आण्णा कुठे आहेत अस विचारते…सुधीरला काहीच समजत नाही कारण राञी ज्या प्रकाराने ती पडली होती त्यातलं काहीच माहीत नव्हत सुधीरला कारण तो झोपला होता…..मानसी सुधीरला मी ठीक आहे, माझी काळजी करू नकोस, तू आण्णांविषयी आईंना विचार म्हणून सांगते.
सुधीरने आईला विचारल असता रमाताई फक्त एवढच सांगतात की आण्णा आपल्या गावी गेले आहेत; जमीनीचा काहीतरी वाद झाला आहे. सुधीर गावी आपली शेती करत असलेल्या सालगड्याला फोन लावून विचारतो.
तेव्हा त्यालाही धक्काच बसतो कारण त्याच्या चुलत चूलत्याने म्हणजेच आण्णांच्या चुलत भावाने आण्णांना फसवून ती सगळी जमीन स्वतच्या नावावर करून घेतली होती…आणि आण्णा तिथे वाटाघाटी करावयास गेले असता त्यांचा खूप मोठा अपमान केला आहे अस तो गडी सुधीरला सांगतो….सुधीर फोन ठेवतो व लागलीच आण्णांना काॅल करतो.
“आण्णा मी ऐकलय ते खरं आहे का? तुम्हाला मी सांगत होतो….तुम्ही त्या लोकांवर विश्वास ठेवू नकात….शेतात एवढे पैसे गुंतवायला नको पण तुम्ही नाही ऐकलं माझं..”
“सुधीर मला क्षमा कर….मी चुकलोच फक्त शेताच्याच बाबतीत नव्हे तर घरातल्या सगळ्यांच्याच बाबतीत.”
आण्णांचा थरथरत असलेला आवाज आणि त्या आवाजातील आर्तता सुधीरच्या मनात खोलवर पोहचते….त्याला छातीत कुठेतरी दुखल्यासारखं होतं. आपल्या कडक, धाडसी स्वभावाच्या वडीलांना अस ढासळलेलं, अपमानीत पाहून.
“आण्णा अहो मी मुलगा आहे तुमचा…..तुम्ही लगेच घरी या….आपण जमीन तर मिळवूच पण त्या लोकांना धडाही शिकवू…..सध्यातरी तुम्ही आजोबा झाला आहात; या बातमीचा आनंद घ्या.”
“काय…आजोबा….धन्य पावलो मी….देवा खरचं तुझी लीला अघाद आहे…..तु काहीतरी हिरावून घेतोस ते त्याहीपेक्षा चांगल काहीतरी देण्यासाठी….सुधीर मी निघतोय लगेच.”
“आण्णांचा आणि सुधीरचा फोन रमाताई ऐकत होत्या….त्यांनाही खुप आनंद होतो..आण्णांमधील परीवर्तन पाहून…सुधीर तर खुष होऊन आईला मिठीच मारतो.
मानसीला डिस्चार्च मिळतो….बाळ व मानसीच जंगी स्वागत होत घरी…..महत्त्वाच म्हणजे सर्व प्लानिंग आण्णा करतात. आवर्जून मुली शारदा व संगिता यांनाही बोलावतात. घरच्यांनी केलेली तयारी पाहुन मानसी भारावून जाते…!
मानसीला आण्णांच हे रूप पाहून खूपच आनंद होतो….या बाळाबरोबर माझाही जन्म नव्यानेच झाला आहे अस म्हणून आण्णा पुन्हा एकदा घरातल्या सगळ्यांची माफी मागतात स्पेशली रमाताईंची….पण झाले गेले विसरूनी जावे म्हणून रमाताईदेखील आण्णांचा मान ठेवतात.
आण्णा पूर्ण बदलले होते….पूर्णवेळ नातू आणि रमाताईंबरोबर घालवत होते…मधुनमधून मानसी तु तूझीपण काळजी घेत जा…आम्ही बाळाला पाहतो म्हणुन मानसीलाही मुलीप्रमाणे माया लावत होते. आण्णा घरातली सगळी सुञं सुधीरच्या हातात सोपवतात. अधुनमधुन मुलींना घरी बोलवून त्यांना रहाण्यासाठी आग्रह करत असतात.
आण्णांच्या बदललेल्या स्वभावामुळे आणि बाळामुळे घर अगदी हसत-खेळतं झाल होत…..त्यामुळे गेलेल्या जमिनीची खंत कोणालाच राहिली नव्हती….रमाताई मनातुन जे होतं ते चांगल्यासाठीच होत म्हणून मनोमन देवाचे आभार मानत होत्या.
मानसीला आपल्या सासर्यांचे आणखी एक रूप पहायला मिळत होतं आणि आता ते कायम स्वरूपी पहायला मिळणार होतं…त्यामुळे आता तिला घरातल्या स्वातंञ्याबाबत आता ना तिच्या भविष्याची चिंता होती ना तिच्या बाळाच्या भविष्याची.
कथेचे चारही पार्ट वाचल्यास समजते की माणूस हा जन्मत: वाईट नसतो….कधी परिस्थितीमुळे तर कधी लहानपणापासून तो कोणत्या वातावरणात मोठा झाला यावर त्याची जडण-घडण झालेली असते….वेळेनुसार सगळच बदलतं मग माणूस तरी त्याला कसा अपवाद ठरेल? तोही बदलतो फक्त गरज असते; त्याला बदलवणारी परिस्थिती निर्माण होण्याची. अशा माणसाच्या बाह्यपणाकडे दुर्लक्ष करून त्याच्या आत डोकावण्याची….शेवटी माणूस म्हटला की चूका या होणारच; तेव्हा गरज असते त्या चूका माफ करून त्या माणसाला आपलस करण्याची. शेवटी आपण आपल्या माणसांना समजुन नाही घेणार तर मग कोण घेणार?
आयुष्य जगत असताना शेवटी एक वेळ अशी येते की तेव्हा समजतं महत्त्वाच कोण होतं व्यक्ती की आपला अहंकार माञ यालाही काहीजण अपवाद असू शकतात ….खरतरं अशी माणसं आतून खूप कमजोर असतात पण त्यांचा अहंकार त्यांना बदलू देत नाही…..ना स्वतच्या भल्यासाठी नाही इतरांच्या भल्यासाठी….!!
चला तर मग वाचकहो, तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर लाईक, कमेंन्ट, फाॅलो करून नक्की कळवा….धन्यवाद!
कथा आवडल्यास नावासह शेअर करावी.
©माधुरी दिपक पाटील
Copyright
All rights are reserved.
“समर्पण” या कथामालिकेचे सर्व भाग वाचण्यासाठी माझ्या रंग आयुष्याचे या फेसबुक पेजला लाईक करा….धन्यवाद…!!
असं इतक्या सहज कोणीही बदलत नाही. पण गोष्ट छान आहे.