संकल्प करूया साधा सरळ आणि सोप्पा
दुसर्यांच्या सुखासाठी मोकळा करूया
ह्यद्याचा एक छोटासा कप्पा……!
या ओळींना वास्तवात ऊतरवणार्या समाजसेविका म्हणजेच सौ.स्नेहाताई संजय भालेराव. समाजातील तळागाळातील आणि मध्यमवर्गीय स्ञीयांना आर्थिक बळ देण्याचा त्यांचा हा प्रवास जवळजवळ सोळा वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ साली सुरू झाला होता. तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी केलेल्या या विलक्षणीय सामाजिक कामगिरीमुळे त्यांना सुमारे ५२ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एखाद दुसरा पुरस्कार मिळाल्यानंतर हुरळून जाणारे, स्वतला समाजसुधारक म्हणवून घेणारे कितीतरी लोक नंतर समाजकार्याच्या नावाखाली कर्मकांड करत असलेले पाहयला मिळतात……परंतु म्हणतात ना सगळेच सारखे नसतात; समाजाबद्दल विशेषत: महिलांबद्दल कळवळ असणारा शंभरातून एखादा प्रामाणिक आपोआप गर्दीतून बाजूला होतो….किंबहूना जनता स्वत त्या व्यक्तीला “तूच आमचा कैवारी” अस म्हणून गौरविते….
……ती शंभरातील एक व्यक्ती म्हणजेच स्नेहाताई…!
स्वत मध्यमवर्गीय आणि दारीद्र्यरेषेखालील महिलांनी स्नेहाताईंना “ताई तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा, रोजगाराचा मार्ग दाखवा ” अशी विनवणी केली. स्नेहाताईंनी अशा गरजू महिलांच नेतृत्व आनंदाने स्वीकारल.
आजुबाजूला महिलांचे रोजगाराचे प्रश्न, कौटूंबिक समस्या, नवर्याच्या व्यसनामूळे बायकांची होणारी अवहेलना, सततच्या तक्रारी ऐकून त्यावर निवारण करणे, वेळप्रसंगी पोलिस अधिकार्यांची मदत घेऊन तंटे मिटवणे अशा कार्यांमूळे आजुबाजूच्या सामान्य स्ञीयांचा स्नेहाताईंवरील विश्वास वाढत गेला, ताईंकडूनच्या त्यांच्या अपेक्षाही वाढत गेल्या. महिला स्वतहून स्नेहाताईंकडे आल्या. महिलांची गरज लक्षात घेऊन सुरूवातील स्नेहाताईंनी वस्तीपातळीवरील महीलांचे संघटन केले. त्यातूनच २००७ साली स्नेहाताईंनी Sparkle हा स्वतचा बचत गट स्थापन केला.
ज्यांच्यासाठी योजना असतात त्यांना माञ त्याची माहिती मिळत नसते; ही गोष्ट लक्षात घेऊन स्नेहाताईंनी महिलांना बचत गटाविषयी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी समजावून दिल्या.
समाजातील उपेक्षित महिलांप्रती स्नेहाताईंचे काम पाहून महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) २००९-२०१० मध्ये “घे भरारी” फेडरेशनची स्थापना केली. निवडणूकीद्वारे स्नेहाताईंना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर स्नेहाताईंच्या कार्याला खूपच चांगली गती मिळाली. ज्या महीलांना त्यांच्या ऊत्पादनासाठी मार्केट हव होत अशा महिलांना एकञ आणून त्यांचे प्रत्येकी बचत गट बनवले. एक-एक करता स्नेहाताईंनी २०१४ पर्यंत जवळजवळ २२५ बचतगटांची स्थापना केली.
चेंबूर, घाटकोपर, ट्राॅम्बे, अणुशक्तीनगर, सायन, वाशीनाका, विक्रोळी, मुलूंड, भांडूप या भागात कार्य सुरू केले.
महीलांना फूडप्रोडक्ट ऊत्पादनाचे, त्याच्या प्रेझेंन्टेशनचे प्रशिक्षण दिले.
हे सगळ करत असताना खरी अडचण आली ती एक्झीबिशनमध्ये आणि शाॅपमध्ये ऊभा राहून ते प्रोडक्ट विकण्याची….!
गरीब, अडाणी महिला अशाप्रकारे प्रोडक्ट विकायला लाजत होत्या, त्यांचा आत्मविश्वास कमी पडत होता….तर शिक्षीत, मध्यमवर्गीय महिलांच्या अहंकाराला ठेच पोहचत होती, त्यांना दुकानात वा स्टाॅलवर ऊभा राहून ते प्रोडक्ट विकण्याची लाज वाटत होती. पण स्नेहाताईंनी यावरही ऊपाय काढला. त्या स्वत स्टाॅलवर ऊभा राहून प्रोडक्ट विकू लागल्या…..त्यामूळे गरीब, शिक्षीत महिलांनाही वाटू लागल की जर स्नेहाताई स्वत स्टाॅलवर ऊभा राहून सगळ करत आहेत तर आपण का नाही? आपल्या कष्टातून ऊभा राहीलेल्या कामासाठी स्नेहाताई इतक्या झटत आहेत तर आपणही प्रयत्न करायलाच हवेत….अस वाटून त्या स्ञियाही मार्केटिंगमध्ये स्वत भाग घेऊ लागल्या. महिलांना मार्केटिंग कौशल्य पुर्णपणे विकसीत होईपर्यंत स्नेहाताईंनी दहा वर्षे स्वत मार्केटिंग केल.
घे भरारी चे ऊत्कृष्ठ काम पाहून २०११ मध्ये बिग बझारने सहा लाखांची फूड ऊत्पादनांची आॅर्डर दिली. त्यावर्षानंतर घे भरारीला प्रत्येकवर्षी बिग बझारकडून ही आॅर्डर मिळत गेली. तसेच अॅमॅझान वरतीही घे भरारीचे सर्व प्रोडक्ट्स ऊपलब्ध आहेत. घरगुती दिवाळी फराळाची मागणी प्रचंड वाढू लागली. त्यामूळे महिलांना संधी मिळत गेली. रेग्युलर मिळत असलेल्या आॅर्डसमुळे त्यांना रोजगार मिळाला आणि त्यांचा आर्थिक स्तर ऊंचावण्यास मदत झाली. महिलांना स्कील ट्रेनिंग देणे, बॅंकांकडून लोन मिळवून देणे आणि महिलांना छोटे-छोटे ऊद्योगसमुह सुरू करून देणे यासाठी स्नेहाताईंनी मदत केली.
झेप ऊद्योगिनी व्यासपीठामुळे “नमस्ते भारत” या एक्झीबीशन अंतर्गत घे भरारीचे प्रोडक्ट्स आंतरराष्र्टीय पातळीवर पोहचले. झेप ऊद्योगिनीच्या संस्थापिका सौ.पुर्णिमाताई शिरीषकर यांनी घे भरारीच्या महिलांना आंतरराष्र्टीय पातळीवर त्यांच्या प्रोडक्टचे माक्रेटिंग कशाप्रकारे करावयाचे यासाठीचे ट्रेनिंग दिले. त्यामुळे या महिलांना माक्रेटिंग आणि प्रोडक्ट पॅकेजिंग व प्रेझेंन्टेशनचा खुप चांगला अनुभव आला. घे भरारीच्या महिलांना पुढे जाता याव यासाठी झेप ऊद्योगिनी व्यासपीठाकडून खुप अपेक्षा आहेत; अस स्नेहाताई म्हणत आहेत.
घे भरारी लोकसंचालीत साधन केंद्राद्वारे वर्षातून साधारणत: पाच ते सहा शिबिर घेतले जातात. त्यामध्ये आरोग्य, समुपदेशन, शिक्षणाचा प्रसार ईत्यादी शिबीर घेतली जातात. महिलांना ब्रेस्ट कॅन्सची माहिती दिली जाते. महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्व टेस्ट मोफत केल्या जातात. अशी गरीब मुले, जी शाळेत जात नाहीत…त्यांच्या घरी जावून, त्यांच्या पालकांना शिक्षणाच महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन केल जात. त्यामध्ये दारू, ड्रग्ज, सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळे होणारे रोग, त्याचे शरीरावर होणारे परीणाम याविषयी स्नेहाताई काही महिलांना बरोबर घेऊन स्वत झोपडपट्टीत जावून जनजागृती करतात.
सौ.स्नेहाताई संजय भालेराव यांच्या समाजकार्याची दखल घेऊन अमेरीकेने(न्यूयाॅर्क) त्यांना २०१८ मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल चेंजमेकर अॅवार्ड प्रदान केला. तर २०१९ मध्ये महाराष्र्ट शासनाकडून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले…..!
स्नेहाताईंच्या या प्रवासात त्यांच्या मिस्टरांनी त्यांना खुप सपोर्ट केला. कौटूंबिक अडचणींमुळे सुरूवातीला ज्या-ज्यावेळी स्नेहाताईंच पाऊल मागे पडायच, त्या-त्यावेळी संजय सर त्यांना प्रोत्साहित करायचे ; “संकटात सापडलेल्या व्यक्तीसाठी तुम्ही मदत करू शकत नसाल, तर तुम्ही त्याच्यासाठी रोजगार ऊपलब्ध करून द्या” सरांच्या या एकाच वाक्याने स्नेहाताईंना खुप प्रेरणा मिळायची आणि त्यातून समाजकार्य घडत जायच.
कोव्हीड-१९ च्या महामारीत स्नेहाताईं बचत गटातील महिलांना घेऊन ज्या लोकांचे रोजगार गेले आहेत, एकवेळच्या जेवणाची भ्रांत पडत आहे अशा लोकांपर्यंत राशन पोहचवण्याची सोयदेखील करत आहेत. तसेच तरूण मुली, मुले यांनाही त्या रोजगार ऊपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत.
सध्या घे भरारीने MBA कंपनीबरोबर महाराष्र्टातून बाकी राज्यांना मिरची पावडर सप्लाय करण्याच नवीन काम हाती घेतल आहे.
घे भरारीच्या ऊत्कृष्ठ कार्यावर आणि सौ.स्नेहाताई भालेराव यांच्या मार्गदर्शनावर असलेल्या विश्वासामुळे सरकारने माविमच्या सहकार्याने ११ शिलाई मशीन वाटपाच काम स्नेहाताईंवर सोपवल…..बरोबरच सरकारने फूड ऊत्पादन बनवत असताना महिलांना येणार्या जागेचा प्राॅब्लेम सोडविण्यासाठी किचन युनिटही प्रोव्हाईड केल आहे.
सध्याच्या कोरोना काळात फूड प्रोडक्ट व्यवसायाची गती मंदावली….त्यामूळे बॅग मेकिंग व मार्केटिंगमधून महिलांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसेच शेतकरी व महिला यांचा समन्वय साधून घरपोच भाजी, फळे व धान्य पोहचवण्याची व्यवस्थाही घे भरारीने सुरू केली आहे.
स्नेहाताईंनी खूपवेळा अध्यक्षपद सोडण्याचा, राजीनामा देण्याचा विचार केला….परंतु इतर महिलांसाठी, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी पुन्हा आपले काम अविरत चालू ठेवले…!
माणसाचे मोठेपण हे त्याने किती माणसे मोठी केली यावरून समजत….ही ऊक्ती स्नेहाताईंना एकदम परफेक्ट लागू होतेय. अदम्य आत्मविश्वास आणि कर्तुत्वाने समाजात स्वतचे स्थान निर्माण करणार्या सौ.स्नेहाताई संजय भालेराव यांना मनापासून सलाम…! प्रत्येक स्ञीने तुमच्यासारखा विश्वास बाळगला आणि एकमेकांना मदत करून पुढे जाण्याच ठरवल तर प्रत्येक स्ञी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल…..!!!
सध्या सौ.स्नेहा मॅडम भुषवत असलेली पदे:-
१)घे भरारी अध्यक्षा (संलग्न माविम)
२)मुंबई महिला ऊपाध्यक्षा
३)सदस्य-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समिती
४)सदस्य-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ऊत्सव समिती
५)संघटक- तनिष्का साम सकाळ
अधिक माहितीसाठी वा तुम्हाला हव्या असलेल्या मदतीसाठी संपर्क करा:
name-Mrs.Sneha Sanjay Bhalerao
contact-9892354889
घे भरारी फेसबुक पेज:- घे भरारी पेज लींक
फोटो_साभार_सौ.स्नेहाताई संजय भलेराव
©माधुरी दिपक पाटील
लेख शेअर करायचा असल्यास नावासह शेअर करावा……©All rights are reserved.
असेच लेख वाचण्यासाठी माझ्या रंग आयुष्याचे फेसबुक पेजला नक्की भेट द्या….धन्यवाद..!!