भाग १-https://madhudeep.com/?p=526
अनन्या “मला जाॅब करायचा आहे, पुढे शिकायच आहे…..” अस शरदरावांना सांगते. यावर शरदराव “लग्नानंतर शीक….” अस म्हणाले असता अनन्या तिचा पुढचा मुद्दा पुढे करते “तुम्ही पाठवलेला मुलाचा बायोडाटा मला पसंत नाही….मला ज्यावेळी तो मुलगा, त्याच शिक्षण पसंत पडेल तेव्हाच मी लग्न करेन” अशी म्हणतेय न तोपर्यंत शरदराव पेटून ऊठतात….”हाच दिवस दाखवण्यासाठी तूला लहानाच मोठ केल का? माझी आजपर्यंत कमावलेली ईज्जत तू धूळीला मिळवायला निघालीस?
अनन्या तुझ लग्न मी पसंत केलेल्या मूलाशीच होईल…..बाकी मला काही माहीत नाही….आणि हो तू तस नाही केल तर माझ मरलेल तोंड बघशील….” एवढ बोलून शरदराव शोभनाताईंनाही “मूलीला नीट समजावून सांगा…..शेवटी तूमचे संस्कार आहेत ते….” अस बोलून ताकीद देतात आणि अप्रत्यक्षपणे शोभनाईंच्या संस्कारावर बोट ठेवतात.
बाबांच्या अशा ञाग्यामुळे अनन्या घाबरते. बाबांनीच पाठ फिरवली तर कोणाकडे पाहयचं.
आई? आई तर पहिल्यापासून शांत, संयमी, बाबांच्या विरोधात न जाता सगळ काही चुपचाप सहन करणारी……त्यामूळे अनन्या बाबा ठरवतील तेच आपल नशीब अस ठरवून लग्नाला तयार होते..!
लहानपणापासून बाबांच्या तिच्यावरील हक्काला प्रेम मानणारी अनन्या आतुन पूर्ण हलली होती….तिला कळून चुकल होत की बांबाशिवाय आपल आस्तित्व काहीच नाही….तिला समजल होत की आत्तापर्यंत ती कोणताही ठोस निर्णय का घेऊ शकली नव्हती…..तिच्यावरील हक्करूपी प्रेमामूळे कायमच तिची घुसमट होत राहिली आणि याच घुसमटीला ती प्रेम मानून बसली होती….नेहमीच ती बाबांवर अवलबून राहिली होती आणि यामूळेच ती त्यांच्या निर्णयाविरोधात जावू शकत नव्हती.
अनन्याच लग्न ज्या मुलाशी होणार होतं त्याच नाव आलोक. आलोक इंजिनीअर असून एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. आई वडीलांना एकूलता एक होता. तो जाॅबमुळे शहरात राहयचा…. आई-वडील गावी असायचे.
अनन्याच्या मनाची तयारी नसतानाही शेवटी बाबांसाठी अनन्या संसाराच माप ओलांडून आलोकच्या घरी प्रवेश करते. इथूनपुढे अनन्याच्या आयुष्याला नवीन वळण भेटणार होत……!
आलोक कामानिमित्त पूण्यात राहयचा. त्यामूळे लग्नानंतर सगळे विधी पार पडेपर्यंत आलोक आणि अनन्या गावीच राहिले. रजा संपल्यावरती आलोक अनन्याला घेऊन पूण्याला रवाना झाला…..आणि सुरू झाला राजाराणीचा संसार.
आलोक अनन्याची खूप काळजी घेत होता. लोक अनन्यासाठी करत असलेल्या लहान-लहान गोष्टीतून अनन्याला त्याच प्रेम जाणवत होत. आलोकच्या प्रेमाने ती आलोकमय कधी झाली तिलाच नाही समजल. मुली असतातच अशा एकदा लग्न झाल की नवर्याला सर्वस्व मानून पूर्णपणे स्वतला त्याच्याप्रती समर्पित करून टाकतात…..पण हे समर्पन खरचं त्या मूलीला पुढे जावून आदरयुक्त आयुष्य देत का? हा एक प्रश्नच आहे…..?
अनन्या आणि आलोकच प्रेम दिवसेंदिवस खुलत होतं. अनन्याला मनोमन वाटणारी एक गोष्ट म्हणजे तिला लग्न करतेवेळी होणारा नवरा हा तिच्या बाबांसारखा नको होता….कारण बाबांचा तिच्या आईला वारंवार डाॅमिनेट करण्याचा स्वभाव…..असा स्वभाव असणारा नवरा तिला नको होता…..आणि आलोक तसा नाही आहे; या विचाराने अनन्या आनंदी होती. मूलांवर त्यांच्या आई-वडीलांच्या सहजीवनाचा परीणाम होतो हेच खर……!
अनन्या आणि आलोक यांच्या प्रेमवेलीवर एक सूंदर फूल ऊमलणार असल्याची गोड बातमी कळताच आलोक आनंदाने वेडा होतो. आपल्याला मुलगीच होणार, मला मूलगीच हवी अस तो अनन्याला सारख म्हणायचा. याऊलट अनन्याला मूलगाच होऊदे अस वाटायच; एका मूलीच आयुष्य किती सहनशील असत ते तिने लहानपणापासून अनूभवल होत, आजुबाजूला पाहिल होत…..आपल्या आईच बाबांभोवती फिरणार जग, त्यानंतर तिच स्वतच आलोकभोवती फिरणार जग…..स्वतला मुलगी होऊन अनन्याला पून्हा नको होती ही पुनरावृत्ती…..!!
पण शेवटी देवाने आलोकच ऐकल आणि गोड मूलीने जन्म घेतला. अनन्याने मुलगी होताक्षणीच मनाशी ठरवल की माझ्या मुलीच्या बाबतीत सगळे निर्णय ती स्वत घेईल….ना की तिचा जन्मदाता वा तिचा नवरा…..मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तीला मी तितक सक्षम बनवेन…..!
आलोक आणि अनन्याने मिळून मूलीच नाव अन्वी ठेवल. अन्वीच्या बाललीला पाहण्यात आलोक गुंग होऊन जायचा…..माझी मुलगी म्हणजे माझा जीव की प्राण आहे;अस तो सारख म्हणायचा.
अनन्यालाही आलोकच कौतूक वाटायच की आलोक अन्वीच सगळ किती मनापासून करतो. अन्वीही तिच्या डॅडाला तेवढाच जीव लावायची. बापलेकीच प्रेम पाहून अनन्याला समाधान वाटायच.
माञ पुढे जावून आलोकने अन्वीला तिच आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याच स्वातंञ्य द्याव ना की माझ्या बाबांसारख ही रुखरूख माञ अनन्याला सारखी वाटत राहयची.
अलोकने अन्वीचा पहिला वाढदिवस खूप मोठा साजरा केला. सर्व नातेवाईक, त्याचे आईवडील, अनन्याचे आईबाबा, आॅफीस स्टाफ, पाहूणेमंडळी बोलावली.
अनन्याचे आईबाबा म्हणजेच शरदराव आणि शोभनाताई यांनाही खूप छान वाटल नातीच होत असलेल कौतुक आणि अनन्याला खूष पाहून…..शरदरावांना त्याक्षणी जावयाचा कोण अभिमान वाटला होता. आपली मुलगी अनन्या इथे खूष आहे हे पाहून समाधानाने शरदराव आणि शोभनाताई सर्वांचा निरोप घेतात……पण शरदरावांना हे कुठे माहित होत की सगळ असच सुरळीत चालणार नव्हतं. नियतीकडे सर्वांच्या कर्मांचा लेखाजोखा असतो. त्यांनी स्वतच्या पत्नीला दिलेला ञास अनन्याच्या रूपात त्यांना तो ऊलट भोगावा लागणार होता…..जे त्यांनी शोभनाताईंच्या बाबतीत केल तेच अनन्याच्या बाबतीत होऊन त्यांच्या कर्माची परतफेड लवकरच होणार होती…..!
खरचं अस होईल अनन्यावर इतक प्रेम करणारा आलोक तिला ञास देईल? अन्वीच भविष्य कस असेल? लवकरच वाचूयात पुढील भागात….!
क्रमश………
पुढचा भाग लवकरच.
©माधुरी सोनवलकर-पाटील
फोटो_साभार_pixabay
कथेचा पुढचा भाग वाचण्यासाठी माझ्या
रंग आयुष्याचे या फेसबुुक पेजला लाईक करा….!
Comments 2