सकाळची वेळ…. सानू पटपट आवरून बाहेर पडणार होती….तिला एका अर्थतज्ञाची भेट घ्यायची होती कारण काॅलेजमध्ये तिला एका विषयावर project बनवायचा होता आणि विषय होता ” भविष्यात येणार्या मंदीपासून वाचण्याचे ऊपाय ”
‘ सानू आवरलसं का ?’ बाबांची हाक येते…..कारण बाबा सानूला अर्थतज्ञ मॅडम कडे सोडणार होते…..त्या मॅडम बाबांच्या ओळखीच्या होत्या…..बाबांच्या ओळखीनेच ती मॅडमचं मार्गदर्शन घेणार होती…..
बाबा सानूला सोडतात आणि घरी जातात….
स्थळ : आराधना मॅडमचे office(अर्थतज्ञ)
सानू : गुड माॅर्निंग मॅडम
आराधना मॅडम : गुड माॅर्निंग सानू , आत ये बैस…तुझ्या बाबांनी सांगितल मला तुझ्याबद्दल , तुझ्या project चा विषय आवडला मला……’भविष्यात येणार्या मंदीपासून कस वाचायच?’ एकंदरीतच ”काय सगळी सोंग आणता येतात पण पैशाच नाही ” अस म्हणून मॅडम आणि सानू दोघी हसू लागतात…..मॅडमांना काय म्हणायच आहे हे सानूला ही समजलं. मॅडमच्या फ्री स्वभावाने सानूही त्यांच्याशी सल्लामसलत करायला आणखी कम्फर्टेबल होते….
सानू : मॅडम सध्या सगळ्याच क्षेञात खूप मंदी आलेय. मीपण हे वर्तमानपञ, T.V. मधूनच वाचलय आणि पाहिलय….. तर यावर तुमच काय मत आहे ?
आराधना मॅडम : हो तू म्हणतेस ते अगदी खर आहे. मंदीची लाट सर्वच क्षेञात कमी-अधिक प्रमाणात आहे …पण वाहन क्षेञ, घरबांधणी क्षेञ, वस्ञोद्योग क्षेञातही खूपच जास्त मंदी आली आहे……अनेक वाहन शोरूम बंद पडली तसेच लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे…..म्हणजे या मंदीच सावट एवढ वाढलं आहे की देशातील अनुभवी अर्थतज्ञांनी मंदी बाबत भिती व्यक्त केली आहे…..तु वाचलं असशीलच की हजारो गरीबांना रोजगार देणार्या parle-G बिस्कीट कंपनीने देखील येणार्या काळात हजारो कामगारांना कमी करण्याची शक्यता केली आहे…..
सानू : होना मॅडम…..पण एवढ्या मोठ्या कंपन्या या मंदीतून वाचू शकत नाही तिथं सामान्य माणूस काय करणार ? त्यात महागाई वाढलेय…..
आराधना मॅडम : हिच तर खरी कसौटी आहे. हे बघ आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करू शकतोय….मान्य आहे महागाई वाढलेय…..पण प्रत्येक गोष्टीवर ऊपाय हा असतोच! आपण ते ऊपाय पाहूयात…..
अतिरीक्त खर्चावर नियंञण आणून : म्हणजे पहा अनावश्यक कपडे खरेदी, हाॅटेलिंग, थिअटेरिंग….या गोष्टींची प्रत्येकवेळी आवश्यकता नसतानादेखील आपण खरेदी करतो….शक्यतो याबाबतीत स्ञियांचे प्रमाण जास्तच असते याला मी देखील अपवाद नाही…..sell, discount वैगेरे बाबींना भुलून एका वस्तूची गरज असताना अनेक वस्तूंची खरेदी, तसेच बायकांना भांडी खरेदी करायची तर भारीच आवड, स्वयंपाक खोलीत कितीही भांडी असली तरी त्यांना कमीच !….या सर्व गोष्टी नियंञणात आणायला हव्यात, आपल उत्पन्न किती आणि आपला खर्च किती व्हायला हवा याचा ताळमेळ बसवणे खुप महत्वाचे आहे…
ऊत्पन्नाचा पर्यायी मार्ग : आपण एकाच source वर depend राहून चालणार नाही. त्याला पर्यायी मार्ग शोधायला हवा….चुकून आपल्या रोजगाराच क्षेञ मंदीत सापडल आणि आपला जाॅब गेलाच तर दुसरा option असावा…..त्यासाठी आपण online business वैगेरे करू शकतो…
बचत करणे : प्रत्येक महिन्याला थोडीफार रक्कम बाजूला काढून ठेवणे किंवा saving account वर ठेवू शकतो….त्यासाठी रोजच्या खर्चात थोडी काटकसर करावी लागेल….पण एकदा काटकसर करण्याची सवय लागली ना तुम्हालाही समाधान वाटेल…….की बाबा आपल्याकडे शिल्लक रक्कम आहे……
कुटुंबियांसोबत चर्चा करणे : हे खूप महत्वाच आहे, कुटुंबातील सर्व लोकांना घरातील आर्थिक बाजूचे ज्ञान असायला हवे…..जेणेकरून घरात पैसे येतायत कीती आणि जातायेत कीती याचा हिशोब करता यावा, जेणेकरून भविष्यात अचानक येणार्या संकटापासून घरातील सदस्य वाचू शकतात….
Meditation : ( meditation म्हटल्यावर सानू दचकते आणि म्हणते ‘meditation चा इथ काय उपयोग ?’) मॅडम : हो उपयोग आहे. आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगात हे अत्यंत महत्वाच होवून बसलयं,meditation मुळे मन शांत होत ज्यामूळे कोणत्याही problem वर solution सापडायला मदत होते…..चांगले पर्यायी मार्ग सुचतात….
सकारात्मकता : सध्या आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणे…..ऊगीच दुसर्या लोकांशी तुलना न करता….अंथरूण पाहून पाय पसरावे इतकच…!! सानू : खूपच छान मॅडम, मला तुम्ही सांगितलेले सर्व मुद्दे पटले……पण हे सगळ adjust करताना थोडाफार तरी मानसिक ञास होणार ना मग ? आराधना मॅडम : काही नाही गं…..आयुष्यात चढ-ऊतार येतच असतात….तेव्हा जास्त ताण नाही घ्यायचा….आणि कोणतीच गोष्ट अती करायची नाही कारण अती केल की माती होणारचं…..त्यातूनही खूपच ten आलच तर बाहेर trip ला जावू शकतोय किंवा best option आपले छंद जोपासणे….. सानू : थॅंन्कू सो मच मॅम ! खूप छान समजावला विषय तुम्ही…..माझ्या सर्व project मेम्बरला आवडेल…. आराधना मॅडम : बेस्ट लक फाॅर युअर project…!
……समाप्त…..
तर वाचकहो भविष्यात येणार्या मंदीपासून वाचण्यासाठी आणखी काय उपाय करता येतील हे मला like, share, comment करून नक्की कळवा…..धन्यवाद !
हो आणि असेच छान ब्लाॅग वाचण्यासाठी माझ्या रंग आयुष्याचे(http://www.facebook.com/hernewinning/)
या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा.
© माधुरी सोनवलकर-पाटील
फोटो साभार गुगल